Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

Badminton: ऋषिका नंदीने निशिका गोखेचा २१-१४, २१-१० असा तर,  युतीका चव्हाणने लावण्या कार्कीचा २१-१५, २१-१० असा पराभव करून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 27, 2026 | 04:33 PM
pune badminton competition

pune badminton competition

Follow Us
Follow Us:
  • सुशांत चिपलकट्टी स्मृती पुणे महापौर करंडक बॅडमिंटन
  • पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का 
  • शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु आहे स्पर्धा 
Badminton: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात वीरेन सेठ,  हार्दिक दिव्यांश,  कार्तिक दुबे यांनी, तर मुलींच्या गटात  आदर्शिनी श्री बूपथी बालाजी, धिष्ठा सिंघा गोपीनाथ यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित वीरेन सेठ याने नवव्या मानांकित भारताच्या अश्विन लेनिन मुथुराजचा  २१-१०, १०-२१, २१-१० असा तर, हार्दिक दिव्यांशने चौदाव्या मानांकित कार्तिक रूपा सुहासचा  २१-११, २१-१६ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. कार्तिक दुबेने बाराव्या मानांकित आरुष पावसकरवर १७-२१, २१-१२, २१-१८ असा सनसनाटी विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत तेराव्या मानांकित बोर्निल आकाश चांगमाईने अनयन बोराहचे आव्हान २१-१५, १९-२१, २१-१७ असे मोडीत काढले. तिसऱ्या मानांकित साई भत्राजूने वैभव सिंगला २१-१८, २३-२१ असे नमविले.

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय

सहावी मानांकित राधा गाडगीळ पराभूत

मुलींच्या गटात आदर्शिनी श्री बूपथी बालाजी हिने सहाव्या मानांकित राधा गाडगीळचा २१-१२, २१-१० असा सहज पराभव केला. धिष्ठा सिंघा गोपीनाथने सातव्या मानांकित हासना श्री मल्लावरपूचे आव्हान १०-२१, २१-१४, १३-०८ असे संपुष्टात आणले. ऋषिका नंदीने निशिका गोखेचा २१-१४, २१-१० असा तर,  युतीका चव्हाणने लावण्या कार्कीचा २१-१५, २१-१० असा पराभव करून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे मानद सर चिटणीस सीए रणजीत नातु, खजिनदार सारंग लागू, सह सचिव आनंद जोशी, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, गिरीश नातू, मिहीर रतनजामकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल पुरुष दुहेरी- पहिली फेरी 

शोर्या जाव्वाजी / अर्णव शर्मा (भारत) वि. वि. सौर्य महर्जन / सुबिन श्रेष्ठ (नेपाळ) २१-०८, २१-१५; श्रेयस चंद्र शेखर / मयुख देशल्ली भुवनेश्वरा (भारत) वि. वि. दिव्यम केजरीवाल / सुभ्रा केतन मल्लिक २१-१६, २४-२२; आर्यबका ओक्ता डिसाबियन / मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया (इंडोनेशिया) वि. वि. ओझस जोशी / अवधूत कदम (भारत) २१-१८, २१-१७; योगांश सिंग / आथिश श्रीनिवास पीव्ही (भारत) (३) वि. वि. यदुनंदन केंचय्या / अमिथ नटराज (भारत) २१-२३, २१-१७, २१-१२

BWF World Championships 2026: त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंदची कमाल; चीनला हरवून १५ वर्षांनंतर महिला दुहेरीत भारताचे पदक

मुली दुहेरी
चन्थरात मर्ंदाकुल / पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन (थायलंड) वि. वि. शरयू रांजणे / सोयरा शेलार (भारत) २१-१४, १९-१५;
अक्षया चौधरी आलुरु / गगना श्री चौधरी कोलापनेनी (भारत) वि. वि. अस्मिता खत्री / रिहाना शेरचन (नेपाळ) २१-११, २१-०९;
वर्ण प्रभुनंद / सुहिना रॉय (भारत) वि. वि. यांगचेन डोलकर / त्शेरिंग डेकी यांगडेन (भूतान) २१-०५, २१-०७

Web Title: Five players suffer shock defeats at sushant chiplakatti memorial pune mayors trophy badminton tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Badminton
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला
1

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला

मिडासएक्स कंपनीची गुंतवणूक क्षेत्रात झेप; एमएफ युटिलिटीज इंडियासोबत केली धोरणात्मक भागीदारी
2

मिडासएक्स कंपनीची गुंतवणूक क्षेत्रात झेप; एमएफ युटिलिटीज इंडियासोबत केली धोरणात्मक भागीदारी

पुण्यात ‘या’ तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 
3

पुण्यात ‘या’ तारखेला तंत्रज्ञान अन् नवकल्पना परिषद; विविध प्रकल्प व उत्पादनांचे होणार सादरीकरण 

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
4

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.