
अंतिम शिट्टी वाजल्यानंतर, ऑर्लँडो गिल एम्बाप्पेला अभिनंदन करण्यासाठी त्याच्याजवळ गेला आणि हँडशेक करण्याचा प्रयत्न केला. पण एम्बाप्पेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जात राहिला. यामुळे गिलला राग आला आणि त्याने रागाने मॅच बॉल एम्बाप्पेच्या पाठीच्या दिशेने फेकला. चेंडू लागूनही, एम्बाप्पेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे प्रकरण पुढे वाढले नाही. ही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही सेकंदातच व्हायरल झाला.
सामन्यात दोन्ही संघांमध्ये ७० मिनिटे जोरदार लढत पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान अनेक वेळा दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये झटापट झाली. एम्बाप्पे आणि दिएगो एकमेकांच्या दिशेने धावून गेले. त्यानंतर पॅराग्वेच्या खेळाडूंनी एम्बाप्पेला ढकलण्यास सुरुवात केली. फ्रेंच खेळाडूही त्यात सामील झाले आणि झटापट सुरू झाली. पंचांनी सुरुवातीला हस्तक्षेप करून एम्बाप्पेला बाजूला नेले, पण नंतर दोन्ही संघांचे खेळाडू आल्यावर पंच बाजूला झाले.
पॅराग्वेच्या मजबूत बचावामुळे फ्रान्सच्या स्टार खेळाडूंना मोकळेपणाने खेळता आले नाही. अखेरीस, ७० व्या मिनिटाला, बॉक्सच्या आत डेझायर डुएवर फाऊल झाला. पंचांनी सुरुवातीला खेळ चालू ठेवण्याचा इशारा दिला, परंतु VAR पुनरावलोकनानंतर फ्रान्सला पेनल्टी देण्यात आली.
Mbappé lo ignoró y Gill le tiró le pegó con la pelota. Banco todo https://t.co/vS0ktb39zi pic.twitter.com/e10RQswW3l — Fabipa (@fabipa90) July 5, 2026
Mbappe celebrating in front of Paraguay goalie and aired his handshake 😭😭😭😭😭https://t.co/HXXFlubILw — fan 🇵🇹 (@NoodleHairCR7) July 4, 2026
सामन्यानंतर एमबाप्पे म्हणाला की, फ्रान्सला आधीच माहित होते की हा सामना सोपा नसेल. तो म्हणाला की, ‘हा सामना कसा होणार आहे हे आम्हाला माहित होते. गरज पडल्यास, आम्ही कठोर परिश्रम करू. आम्ही डर्टी फुटबॉलसुद्धा खेळू शकतो. त्यांना वाटले की आम्ही फक्त सुंदर फुटबॉल खेळायला आलो आहोत, पण आम्हाला प्रत्येक प्रकारचा खेळ कसा खेळायचा हे माहित आहे. ती त्यांची खेळण्याची पद्धत आहे. फुटबॉलमध्ये कोणतीही योग्य किंवा अयोग्य पद्धत नसते, फक्त विजय महत्त्वाचा असतो. त्यांनी आम्हाला त्याच पद्धतीने हरवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यांना त्यांच्याच खेळात हरवले.’
या घटनेनंतर ऑर्लँडो गिल म्हणाला की, “मी त्याचे अभिनंदन करण्यासाठी हात पुढे केला, पण त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले, जणू मी तिथे नव्हतोच. त्या क्षणी, मी राग आणि भावनांनी भारावून गेलो होतो. दुसरे काहीही घडले नाही. नंतर, मी शांत झालो आणि मला फक्त त्याचे अभिनंदन करायचे होते.”
पॅराग्वेने या सामन्यात दोन वेळच्या विश्वविजेत्या फ्रान्सला कडवी झुंज दिली. अखेरीस, ७० व्या मिनिटाला एमबाप्पेने सामन्यावर शिक्कामोर्तब केले. पेनल्टी एरियामध्ये वेगाने घुसणाऱ्या डेझायर डोएवर दिएगो गोमेझने फाऊल केल्यामुळे पेनल्टी मिळाली, जी एमबाप्पेने गोलमध्ये रूपांतरित केली. आता फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोचा सामना करेल.