महिला टी-२० विश्वचषक २०२६ ( ICC Women’s t 20 World cup 2026) च्या अंतिम सामना आज लॉर्ड्स या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. आज यजमान इंग्लंड आणि ६ वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्रॉफीसाठी चुरशीची लढत होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे आणि अंतिम सामन्यातही सहज प्रवेश केला आहे. इंग्लंडने २००९ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. आता ते १७ वर्षांत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरण्याचा प्रयतन करेल.
विश्वचषकाची सुरुवात २००९ मध्ये झाली. इंग्लंडच्या महिला संघाने प्रथमच ही ट्रॉफी जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाची ही विजयी मालिका २०१६ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या वेस्ट इंडिजने खंडित केली. परंतु, २०१६ नंतर, ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये पुन्हा टी-२० विश्वचषक जिंकून हॅटट्रिक पूर्ण केली.
ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये चौथ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला आणि २०१८ नंतर २०२० व २०२३ मध्येही टी२० विश्वचषक जिंकला. परंतु, न्यूझीलंडने २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदा ही ट्रॉफी जिंकली. मात्र, यावेळी न्यूझीलंड गट फेरीतच बाहेर पडला आणि ऑस्ट्रेलिया आता सातव्यांदा ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान, इंग्लंडचा महिला संघ २००९ नंतर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात असेल.यावेळी, त्याच विजयी संघाची कर्णधार असलेली शार्लट एडवर्ड्स इंग्लंडची मुख्य प्रशिक्षक आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळाली आहे. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या ४५ सामन्यांपैकी, ऑस्ट्रेलियन महिला संघाने २३ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडच्या महिला संघाने २१ सामने जिंकले असून एक सामना रद्द झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडच्या महिला संघाची घरच्या मैदानावरची कामगिरी प्रभावी आहे, त्यांनी १७ पैकी ११ सामने जिंकले असून केवळ सहा सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या नऊ महिला टी-२० विश्वचषकांपैकी ऑस्ट्रेलियन संघाने पाच विश्वचषक जिंकले आहेत, तर इंग्लंडच्या महिला संघाने केवळ एकदाच ट्ऱॉफी जिंकली आहे.
इंग्लंड: एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनी वायट-हॉज, नॅट सिव्हर-ब्रंट (कर्णधार), अॅलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन, चार्ली डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल.
ऑस्ट्रेलिया: जॉर्जिया वॉल, बेथ मूनी (विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, अॅशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, अॅनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन.






