Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडीच दिवसात खेळ खल्लास! दुसऱ्या कसोटीत भारताचा कांगारुंवर सहा विकेटसनी शानदार विजय, विजयाचे शिल्पकार ठरले ‘हे’ खेळाडू…

  • By Amrut Sutar
Updated On: Feb 19, 2023 | 02:22 PM
अडीच दिवसात खेळ खल्लास! दुसऱ्या कसोटीत भारताचा कांगारुंवर सहा विकेटसनी शानदार विजय, विजयाचे शिल्पकार ठरले ‘हे’ खेळाडू…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली- ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia-India) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामन्यात (Test match) भारताने शानदार विजय मिळवला आहे. भारताने कांगारुंवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्राफीत २-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात कांगारुंनी २६३ धावा केल्या. त्यानंतर काल भारत २६२ धावांवर सर्व बाद झाल्यानंतर कांगारूनी काल एक गडी गमावत डावाची सुरुवात केली होती. दरम्यान, आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची खूपच खराब सुरुवात झाली आणि अवघ्या दीड तासात कांगारूंचा संघ ऑल आऊट झाला. या एकाच सामन्यात भारताचा दमदार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि फिरकीपटू आश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.

भारताची खराब सुरुवात…

कांगारुंचा दुसरा डाव ११५ धावांवर संपला, त्यानंतर ११५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. के एल राहुल १ धावावर बाद झाला. तर रोहित शर्मा ३१ धावांवर धावबाद झाला. यानंतर कोहली व पुजाराने डावाला आकार देत ६९ धावापर्यंत मजल मारली. कोहली २० धावांवर यष्टिचित झाला. यानंतर अय्यरने आक्रमक फलंदाजी केली मात्र खेळ लवकर संपवण्याचा नादात श्रेयश अय्यर १२ धावांवर झेल देऊन बाद झाला, यात त्याने १ षटाकर व १ चौकार मारला. यानंतर अधिक पडझड न होऊ देता पुजारा व भरतने भारताला विजय मिळवून दिला. यात पुजारा ३१ व भरत २३ धावांवर नाबाद राहिले.

फिरकीपुढे कांगारुंची नांगी…

ऑस्ट्रेलियाने दिवसअखेपर्यंत १ बाद ६१ धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. त्यांच्याकडे ६२ धावांची आघाडी होती. ट्रॅव्हिस हेड (४० चेंडूंत ३९) आणि मार्नस लाबुशेन (१९ चेंडूंत १६) यांनी तिसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. कालच्या धावसंख्येत अवघ्या ४ धावांची भर घालत ऑस्ट्रेलियाची विकेट्स पडायला सुरुवात झाली.

जडेजाचे सात विकेटस…

सामन्यात भारताच्या दुसऱ्या देशांसाठी घातक असणाऱ्या जडेजा-अश्विन जोडीने कांगारूंना अक्षरशः घाम फोडला. त्यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज कत्थक करताना दिसले. दुसऱ्या डावात ११३ धावांवर ऑस्ट्रेलिया डाव आटोपला आणि विजयासाठी ११५ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. अश्विनने या डावात ३ विकेट्स तर जडेजाने एकट्याने तब्बल ७ विकेट्स घेतले. अश्विनने दुसऱ्या दिवशी भारताकडून विकेट्स घ्यायला सुरुवात केली. कांगारूनी विजयासाठी ११५ धावांचे माफक आव्हान दिले आहे.

विजयाचे शिल्पकार ठरले हे खेळाडू…

दरम्यान, पहिल्या डावात भारताकडून अक्षर पटेल व अश्विन यांनी भारताला सुस्थितीत  नेले. जेव्हा गरज होती आणि भारताची दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली असताना, अक्षर पटेल व अश्विन या जोडीनं भारताच्या डावाला आकार दिला. यामुळं भारत चांगल्या स्थितीत पोहचला. अक्षर पटेल व अश्विन यांच्या खेळीमुळं कांगारुंना पहिल्या डावात मोठ्या धावांची आघाडी मिळाली नाही. दुसऱ्या डावात जडेजाच्या घातक व थुई थुई फिरकीसमोर अक्षरश: कांगारुंना नाचवले. जडेजाने सात विकेटस घेत, कांगारुंना मोठी धावसंख्या घेण्यास रोखले. त्यामुळं पहिल्या सत्रातच कांगारुंना ऑल आऊट केले. त्यामुळं दुसरी कसोटी फक्त अडीच दिवसातच संपली.

Web Title: Game over two and a half days in the second test india brilliant victory over the kangaroos by six wickets these players became the architects of the victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2023 | 02:13 PM

Topics:  

  • Australia
  • Border-Gavaskar trophy
  • delhi
  • IND vs AUS 2nd Test
  • india
  • Test Match

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
2

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
3

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
4

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.