Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Chess: साखळी फेरीच्या तुलनेत अंतिम फेरीतील लढतीचे स्वरूप पूर्णपणे वेगळे होते. काळ्या मोहरा घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंनी पांढऱ्या मोहरांविरुद्ध ४ विरुद्ध ३ अशी आघाडी मिळवून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 09:45 PM
Chess Competition

Chess Competition

Follow Us
Follow Us:
  • गँजेस ग्रँडमास्टर्स संघ ठरला चॅम्पियन
  • कार्लसनच्या चुकीचा नेपोम्नियाचीने उठवला फायदा
  • गतविजेत्या अल्पाइन पायपर्सला नमवून पटकावले पहिले विजेतेपद
पुणे/Chess: जगातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनच्या अनपेक्षित चुकीचा फायदा घेत इयान नेपोम्नियाचीने मिळवलेल्या सनसनाटी विजयाच्या जोरावर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ संघाने ग्लोबल चेस लीग (जीसीएल) स्पर्धेत पहिल्यावहिल्या विजेतेपदावर नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीत गँजेस ग्रँडमास्टर्सने गतविजेत्या ‘अल्पाइन पायपर्स’ संघाला पराभवाचा जोरदार धक्का दिला. बेंगळुरू येथे पार पडलेली ही स्पर्धा ‘टेक महिंद्रा’ आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (फिडे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

दोन टप्प्यांत खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत गँजेस ग्रँडमास्टर्स संघाने ७-५ अशा फरकाने बाजी मारली. पहिल्या टप्प्यात दोन्ही संघांमध्ये ३-३ अशी बरोबरी झाली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात गँजेसच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत सामना आपल्या बाजूने झुकवला. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत ‘अमेरिकन गॅम्बिट्स’ संघाने ‘मुंबा मास्टर्स’ संघाचा ७.५-४.५ अशा फरकाने पराभव करत कांस्यपदक निश्चित केले.

Chess Olympiad: उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचा महासंग्राम! अव्वल ग्रँडमास्टर जवोखिर सिंधारोवकडे मशाल सुपूर्द

अंतिम सामन्यात गँजेसचे वर्चस्व

ग्लोबल चेस लीगचा हा चौथा मोसम अत्यंत चुरशीचा ठरला. सहभागी झालेल्या सर्व सहा संघांचे आव्हान आठव्या फेरीअखेर उपांत्य फेरीसाठी कायम होते. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात मुंबा मास्टर्सने गॅम्बिट्सवर विजय मिळवल्यामुळे पायपर्स संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश सुकर झाला होता. मात्र, गुणतालिकेत अव्वल स्थानासह अंतिम फेरीत पोहोचलेल्या गँजेस ग्रँडमास्टर्सवर त्यांना मात करता आली नाही.

 कार्लसनची घोडचूक अन् सोलासकिडाऊचा विजय

साखळी फेरीच्या तुलनेत अंतिम फेरीतील लढतीचे स्वरूप पूर्णपणे वेगळे होते. काळ्या मोहरा घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंनी पांढऱ्या मोहरांविरुद्ध ४ विरुद्ध ३ अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या टप्प्यातील ३-३ अशा बरोबरीनंतर पायपर्स संघाकडे जेतेपद राखण्याची मोठी संधी होती; कारण कार्लसन पहिल्या पटावर मजबूत स्थितीत खेळत होता.

परंतु, नेपोम्नियाचीविरुद्धच्या निर्णायक डावात कार्लसनने २८ व्या चालीत मोठी घोडचूक केली. या चुकीनंतर त्याला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. त्याच वेळी स्तावरूला सोलासकिडाऊ हिने भारताच्या कोनेरू हम्पीवर मात करत गँजेसच्या ऐतिहासिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, पहिल्या डावात लेव्हॉन अरोनियनने अनिश गिरीविरुद्ध आक्रमक सुरुवात केली होती, मात्र ४९ व्या चालीअखेर वेळेच्या कमतरतेमुळे त्याला विजयापासून वंचित राहावे लागले. दुसऱ्या बाजूला अन्य पटांवरील लढती बरोबरीत सुटत असताना व्होलोदर मुर्जिनने ल्युक लिऑन मॅनडोंकाविरुद्ध ४९ चालींत विजय मिळवत पायपर्सला पहिल्या फेरीत ३-३ अशी बरोबरी साधून दिली होती.

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती

वैयक्तिक पुरस्कार आणि गौरव

अंतिम सामन्याचा मानकरी: इयान नेपोम्नियाची (गँजेस ग्रँडमास्टर्स)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: स्तावरूला सोलासकिडाऊ (गँजेस ग्रँडमास्टर्स) – १२ सामन्यांत ६ विजय आणि ३ बरोबरींसह २१.५ गुण (जावा क्रूझर बाईक देऊन गौरव).
अपराजित खेळाडू: हरिका द्रोणावल्ली (मुंबा मास्टर्स) – संपूर्ण स्पर्धेत १२ सामन्यांत ४ विजय आणि ८ बरोबरींसह १८.५ गुण मिळवून एकही सामना न गमावणारी एकमेव खेळाडू.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीचा मानकरी: निहाल सरीन (अमेरिकन गॅम्बिट्स).
विजय मिळवल्यानंतर नेपोम्नियाची म्हणाला, “काळ्या मोहरांसह खेळण्याची माझी पूर्ण तयारी होती. कार्लसनविरुद्ध खेळताना समोरच्याने चूक करावी अशी अपेक्षा करण्यापलीकडे काही करता येत नाही; आज कार्लसनने ती चूक केली आणि मी नशीबवान ठरलो. मात्र, हे यश सांघिक कामगिरीचे फळ आहे.”

Web Title: Ganges grandmasters clinch global chess league title ian nepomniachtchi powers victory pune chess league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Chess
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
1

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
2

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
3

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
4

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.