सिंधारोवकडे चेस ऑलिम्पियाडची मशाल
बुद्धिबळाचा जागतिक विस्तार साजरा करण्यासोबतच चेस ऑलिम्पियाडबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी फिडेने २०२२ मध्ये ऑलिम्पिक मशालीच्या धर्तीवर ‘चेस ऑलिम्पियाड टॉर्च’ परंपरेची सुरुवात केली. या परंपरेनुसार मशाल विविध टप्प्यांतून प्रवास करत यजमान देशापर्यंत पोहोचते.
याबाबत एआयसीएफचे अध्यक्ष नितीन नारंग म्हणाले, “चेस ऑलिम्पियाडची मशाल ही खेळ राष्ट्रांना आणि पिढ्यांना जोडतो, याचे प्रभावी प्रतीक आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये भारतात या परंपरेची सुरुवात केली होती. बुद्धिबळाची जन्मभूमी असलेल्या भारतातून ही मशाल आता उझबेकिस्तानकडे जात आहे, हे विशेष आहे. दोन्ही देशांमध्ये समृद्ध आणि वाढती बुद्धिबळ संस्कृती आहे.
‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती
समरकंद बुद्धिबळ विश्वाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना आम्ही जवोखिर सिंधारोव आणि उझबेकिस्तानला शुभेच्छा देतो.” दरम्यान, भारताने चेस ऑलिम्पियाडच्या खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये विद्यमान विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारताचे संघ आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार असून, स्पर्धेतील भारताच्या कामगिरीकडे बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे.






