
हार्दिक पंड्या
आयपीएल संपल्यापासून हार्दिक पांड्या क्रिकेटपासून दूर आहे. गंभीरने स्पष्ट केले की, दीर्घकाळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे सोपे नसते, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्ये खेळाडूच्या शरीरावर प्रचंड ताण पडू शकतो.
गौतम गंभीर काय म्हणाला?
हार्दिकने आयपीएलनंतर एकही सामना खेळलेला नाही. सध्याच्या घडीला तो एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 ओव्हर्स गोलंदाजी करण्याइतपत देखील फिट नाहीये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्रिकेटचा ताण जास्त असतो. त्यामुळे हार्दिक पांड्याला घाईघाईत स्थान देऊन त्याच्या दुखापतीचा धोका आम्हाला वाढवून द्यायचा नाही.
भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दारे उघडली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी सिरिजसाठी नितीश रेड्डीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सिरिजसाठी खेळण्याची संधी मिळणे ही नितीशसाठी खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काळात वेगाने गोलंदाजी करणारे ऑल राऊंडर खेळाडू भारतीय संघाच्या समीकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडिया जाहीर
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर, यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जायसवाल, नमन धीर.
ही मालिका कर्णधार शुभमन गिलसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे देखील मैदानावर दिसणार आहेत. हे दोन्ही अनुभवी खेळाडू या मालिकेत दमदार कामगिरी करून आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतील.