
भारतीय क्रिकेट संघाची घोषणा कसे असणार शेड्युल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया. ही मालिका कधी खेळली जाईल? या मालिकेत किती एकदिवसीय आणि टी-२० सामने असतील आणि कोणत्या खेळाडूंना कोणत्या संघात स्थान देण्यात आले आहे.
🚨 News 🚨#TeamIndia ODI & T20I squads announced for West Indies tour of India 2026, along with updated squad for Japan T20I & Asian Games. More Details ▶️https://t.co/Lxx3Bz8Q14 pic.twitter.com/Y9RGlQ09XK — BCCI (@BCCI) September 16, 2026
एकदिवसीय मालिकेत शुभमन गिल भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल, तर केएल राहुलची उपकर्णधार आणि मुख्य यष्टीरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे, जे संघाच्या वरच्या फळीला बळकटी देतील. यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि ध्रुव जुरेल यांसारख्या युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे, ज्यामुळे एक मजबूत आणि संतुलित फलंदाजी फळी तयार झाली आहे.
IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात
एकदिवसीय संघाच्या अष्टपैलू आणि गोलंदाजी विभागात अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांचे उत्तम मिश्रण आहे. रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी आणि नमन धीर यांचा अष्टपैलू पर्याय म्हणून समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादव फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल, तर मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्यांच्यासोबत प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि आकिब नबी यांसारख्या वेगवान गोलंदाजांना आपली छाप सोडण्याची उत्तम संधी मिळेल.
दरम्यान, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांना टी२० मालिकेसाठी सलामीची जोडी म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. टी२० संघात वैभव सूर्यवंशीसह अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांसारख्या आक्रमक फलंदाजांचा समावेश आहे. शिवम दुबे आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यासारखे स्फोटक अष्टपैलू खेळाडू मधल्या फळीत आणि फिनिशरच्या भूमिकेत संघाला अधिक मजबूत करतील.
भारताचा T20 संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन बिनिश कुमार, अरविंद कुमार रेड्डी, वॉशिंग्टन रेड्डी, अरविंद सिंह प्रिन्स यादव आणि मयंक यादव.