india A squad Announced
देवदत्त पडिक्कलला चार दिवसीय सामन्यांसाठी कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे. साई सुदर्शनचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकला नव्हता. आता तो ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध टीम इंडियात परतणार आहे. अमन मोखाडे आणि आयुष पांडे यांनाही संघात स्थान मिळाले आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुमार कुशाग्रचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यश राठोडसोबत शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांचाही चार दिवसीय संघात समावेश आहे. एन. जगदीसन विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहे.
चार दिवसीय संघाच्या वेगवान गोलंदाजी विभागात तुषार देशपांडे, अंशुल कंबोज आणि प्रफुल्ल हिंगे यांचा समावेश आहे. प्रफुल्लने आयपीएल २०२६ मध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले होते. आता त्याला इंडिया ‘अ’ संघात स्थान मिळाले आहे. या संघात युवा खेळाडूंसोबतच देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने प्रभावित केलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे.
ऋतुराज गायकवाडला एकदिवसीय कर्णधार, तर देवदत्त पडिक्कलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हार्दिक पांड्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, हार्दिक फिटनेस चाचणी यशस्वीपणे पार पाडल्यासच या मालिकेत सहभागी होऊ शकेल. साई सुदर्शन आणि प्रियांश आर्य यांचाही एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. रजत पाटीदार, कुमार कुशाग्र आणि नमन धीर मधल्या फळीची धुरा सांभाळतील. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या प्रभसिमरन सिंगकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
🚨 News 🚨 India A squad announced for home series against Australia A, comprising two multi-day matches and three one-day games in Puducherry. Details 🔽https://t.co/qv3pB2OLhj pic.twitter.com/svfhQbnEoV — BCCI (@BCCI) September 9, 2026
भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील मालिका २२ सप्टेंबर रोजी सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये दोन मल्टी-डे सामने खेळले जातील. दुसरा बहुदिवसीय सामना २९ सप्टेंबर रोजी सुरू होईल. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबरला, दुसरा सामना ९ ऑक्टोबरला आणि मालिकेचा अंतिम सामना ११ ऑक्टोबरला खेळला जाईल.
मल्टी-डे सामन्यांसाठी भारत अ संघ: अमन मोखाडे, आयुष पांडे, देवदत्त पडिक्कल (कर्णधार), साई सुदर्शन (उपकर्णधार), यश राठोड, शेख रशीद, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे,अंशुल कंबोज, प्रफुल्ल हिंगे एन. एन जगदीशन (विकेटकीपर), नचिकेत भुटे, व्ही वैश्य
वनडे सामन्यांसाठी भारत अ संघ: प्रियांश आर्य, साई सुदर्शन, देवदत्त पडिककल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रजत पाटीदार, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), निशांत सिंधू, विपराज निगम, अर्शिन कुलकर्णी, अरशद खान, नमन धीर, हार्दिक पांड्या, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), गुरजापनीत सिंग, यश ठाकूर.
Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…






