Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GG vs RCB, WPL 2026 LIVE : RCB चे गुजरात जायंट्ससमोर 179 धावांचे लक्ष्य; गौतमीचे शानदार अर्धशतक 

 महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत गुजरात जायंट्ससमोर १७९ धावांचे आव्हान दिले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 19, 2026 | 09:28 PM
GG vs RCB, WPL 2026 LIVE: RCB sets a target of 179 runs against Gujarat Giants; Gautami scores a brilliant half-century.

GG vs RCB, WPL 2026 LIVE: RCB sets a target of 179 runs against Gujarat Giants; Gautami scores a brilliant half-century.

Follow Us
Close
Follow Us:

GG vs RCB, WPL 2026 LIVE  :  आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीग २०२६ मधील १२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि  गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या आरसीबीने  प्रथम फलंदाजी करत गौतमी नाईकच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ६ गडी गमावून १७८ धावा केल्या आहेत. गुजरातला जिंकण्यासाठी १७९ धावा कराव्या लागणार आहेत. गुजरात जायंट्सकडून काशवी गौतमने २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : Women’s Asia Cup Rising Stars 2026 : भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार! महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे वेळापत्रक जाहीर

 महिला प्रीमियर लीग २०२६ मधील १२ व्या सामन्यातगुजरात जायंट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.  आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. स्मृती मानधनासोबत डावाची सुरुवात करणारी  ग्रेस हॅरिस पहिल्याच ओव्हरमध्ये १ धाव करून बाद झाली.  तिला रेणुका सिंगने बाद केले. त्यानंतर आलेली जॉर्जिया वॉल देखील १ धावेवर काशवी गौतमीची शिकार  ठरली. त्यानंतर आलेली गौतमी नाईकने स्मृती मानधनासोबत भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. या दोघींनी ५८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मानधना २३ चेंडूत २६ धावा करून बाद झाली. त्यानंतर ऋचा घोष आणि नाईकने छोटी भागीदारी केली. दरम्यान गौतमीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघींनी ६९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

दरम्यान, ऋचा घोष २० चेंडूत २७ धावा करून बाद झाली. तिला सोफी डिव्हाईनने माघारी पाठवले. त्यानंतर गौतमी नाईक ५५ चेंडूत ७३ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत ७ चौकर आणि १ षटकार लगावला.  तिला ॲशले गार्डनरने माघारी पाठवले. त्यानंतर नादिन डी क्लर्क ४ धावा, राधा यादव १७ धावा करून बाद झाल्या तर श्रेयांका पाटील ८ धावा करून नाबाद राहिली. गुजरात जायंट्सकडून काशवी गौतम आणि ॲशले गार्डनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर रेणुका सिंग ठाकूर आणि सोफी डिव्हाईन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Innings Break! Useful contributions from the batters propel #RCB to 1️⃣7️⃣8️⃣ 🎯 Can they make it a perfect 5⃣ or will #GG chase it down? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/KAjH515c64 #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB pic.twitter.com/1NsCun3jTk — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026

हेही वाचा : IND vs NZ : सूर्याआर्मी न्यूझीलंडविरुद्धच्या T20I लढतीसाठी सज्ज! भारतीय संघात कोण ‘इन’ आणि कोण ‘आऊट’? वाचा सविस्तर

दोन्ही संघांचे संघ पुढीलप्रमाणे आहेत:

गुजरात जायंट्स:बेथ मूनी (यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, अनुष्का शर्मा, कनिका आहुजा, ॲशले गार्डनर (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, काश्वी गौतम, भारती फुलमाळी, तनुजा कंवर, हॅपी कुमारी, रेणुका सिंग ठाकूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), गौतमी नाईक, नादिन डी क्लर्क, राधा यादव, प्रेमा रावत, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल

Web Title: Gg vs rcb wpl 2026 live rcb sets a target of 179 runs against gujarat giants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • Ashleigh Gardner
  • Smriti Maandhana
  • WPL 2026

संबंधित बातम्या

GG vs RCB, WPL 2026 LIVE : GG विजयी रुळावर परतणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; RCB करणार फलंदाजी 
1

GG vs RCB, WPL 2026 LIVE : GG विजयी रुळावर परतणार? TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; RCB करणार फलंदाजी 

स्मृती मानधनाकडून हरमनप्रीत कौरच्या विक्रमाला धोबी पछाड! WPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली ती पहिलीच भारतीय खेळाडू 
2

स्मृती मानधनाकडून हरमनप्रीत कौरच्या विक्रमाला धोबी पछाड! WPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली ती पहिलीच भारतीय खेळाडू 

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?
3

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?

WPL 2026 : सामना जिंकला पण शतक हुकलं…RCB ने दिल्लीला हरवल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल
4

WPL 2026 : सामना जिंकला पण शतक हुकलं…RCB ने दिल्लीला हरवल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.