Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम

GT vs RR Qualifier 2 Match Rules: गुजरातविरुद्ध राजस्थानचा क्वालिफायर २ सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला मिळणार फायनलमध्ये पोहचण्याची संधी. काय आहेत आयपीएल २०२६ चे नियम, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 29, 2026 | 03:29 PM
IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम
Follow Us
Close
Follow Us:
  • GT vs RR क्वालिफायर सामना
  • सामना रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण पोहेचणार?
  • जाणून घ्या IPL चे नियम
आयपीएल २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आधीच अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता दुसऱ्या अंतिम संघासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर २ मध्ये जोरदार लढत रंगणार आहे. हा सामना आज २९ मे रोजी न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, जर पावसामुळे सामना रद्द झाला, तर कोणत्या संघाला फायनले तिकिट मिळणार? आयपीएल २०२६ चे नियम काय सांगतात, जाणून घेऊयात.

IPL 2026: BCCIचा मोठा निर्णय! IPL मध्ये आता ‘या’ गोष्टीवर बंदी; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

सामना रद्द झाल्यास फायनलमध्ये कोणाला मिळणार एन्ट्री?

आयपीएल २०२६ क्वालिफायर २ सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे क्वालिफायर २ आणि फायनल सामना यांच्यामध्ये फक्त एका दिवसाचे अंतर आहे. तसेच, हे दोन्ही सामने वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. त्यामुळे प्रवास, लॉजिस्टिक्स आणि मॅनेजमेंट लक्षात घेता राखीव दिवस ठेवणे शक्य नसल्याचे मानले जाते.

आयपीएलच्या खेळाच्या नियम आणि अटींमधील कलम १६.१०.३ मध्ये या परिस्थितीसाठी स्पष्ट नियम देण्यात आले आहेत. नियमानुसार, जर पाऊस किंवा खराब हवामानामुळे प्लेऑफ सामना पूर्णपणे रद्द झाला, तर लीग टप्प्यात गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. नियमांनुसार, पंच प्रथम सुपर ओव्हर खेळवण्याची शक्यता तपासतील. जर हवामानामुळे सुपर ओव्हरही शक्य झाली नाही, तर लीग टप्प्यातील गुणतालिकेच्या आधारे निर्णय घेतला जाईल. याच कारणामुळे गुजरात टायटन्सला फायदा होईल. लीग टप्पा संपल्यानंतर गुजरात गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता, तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे सामना रद्द झाल्यास गुजरात थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

पाऊस खलनायक ठरणार का?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाणेफेकीच्या सुमारे अर्धा तास आधी मुल्लानपूरमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच संपूर्ण सामन्यादरम्यान आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, आसपासच्या भागात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.

सामना कधी आणि कुठे खेळला जाणार?

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ सामना शुक्रवार, २९ मे रोजी न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार ७. ३० वाजता सुरु होईल तर सायंकाळी ७:०० वाजता नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात उतरतील.

फायनलच्या तिकिटासाठी रंगणार हायव्होल्टेज लढत

एकीकडे गुजरात संघाने शेवटच्या सामन्यात पराभव पत्करला, तर दुसरीकडे रियान परागच्या राजस्थान रॉयल्सने शेवटच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे क्वालिफायर २ मध्ये चाहत्यांना थरारक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२६ चा अंतिम सामना रविवार, ३१ मे रोजी खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजरात टायटन्स किंवा राजस्थान रॉयल्स यांच्यापैकी एका संघाशी होईल.

GT vs RR Qualifier 2: मुल्लानपूरमध्ये हायव्होल्टेज लढत, गुजरात-राजस्थानमध्ये आज फायनलची जंग,खेळपट्टी कोणाला साथ देणार? वाचा पिच र

Web Title: Gt vs rr qualifier 2 rain rules mullanpur weather update ipl 2026 cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • IPL matches
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

RR vs GT Qualifier 2: “त्याचे व्हिडिओ पाहून ..”: Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?
1

RR vs GT Qualifier 2: “त्याचे व्हिडिओ पाहून ..”: Vaibhav Suryvanshi ला रोखण्यासाठी गुजरातचा प्लॅन काय?

IPL 2026: BCCIचा मोठा निर्णय! IPL मध्ये आता ‘या’ गोष्टीवर बंदी; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई
2

IPL 2026: BCCIचा मोठा निर्णय! IPL मध्ये आता ‘या’ गोष्टीवर बंदी; नियम मोडल्यास होणार कठोर कारवाई

GT vs RR Qualifier 2:  मुल्लानपूरमध्ये हायव्होल्टेज लढत, गुजरात-राजस्थानमध्ये आज फायनलची जंग,खेळपट्टी कोणाला साथ देणार?
3

GT vs RR Qualifier 2: मुल्लानपूरमध्ये हायव्होल्टेज लढत, गुजरात-राजस्थानमध्ये आज फायनलची जंग,खेळपट्टी कोणाला साथ देणार?

Vaibhav Sooryavanshi: क्वालिफायर-2 मध्ये वैभव सूर्यवंशीच्या निशाण्यावर ख्रिस गेलचा ‘तो’ मोठा रेकॉर्ड; रचणार आणखी एक महाविक्रम!
4

Vaibhav Sooryavanshi: क्वालिफायर-2 मध्ये वैभव सूर्यवंशीच्या निशाण्यावर ख्रिस गेलचा ‘तो’ मोठा रेकॉर्ड; रचणार आणखी एक महाविक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.