IND vs NZ 2nd ODI
ind vd nz 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्यात निर्णय घेतला. भारताने नाणेफेक गमावलेल्या किवी संघाला पुन्हा एकदा प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु, पावसामुळे खेळ एक तास उशिरा सुरू झाला. यामुळे सामना ४७-४७ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ ४१ षटकांत १३४ धावांवर गारद झाला. भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज होती. लक्ष्यांचा पाठलाग करताना भारताने ७ विकेट्स गमावून ११३ धावा केल्या. भारताने हा सामना ४ धावांनी जिंकला.






