गूरनूर ब्रारची भेदक गोलंदाजी (फोटो- ians)
भारताने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. न्यूझीलंडच्या फलांडजाणी पुन्हा एकदा निराशा केली. न्यूझीलंडचा अर्धा संघ 50 रन्सच्या आतच आउट झाला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात विल यंग आणि टिम सायफर्टने केली. टिम सायफर्ट शून्यावर आउट झाला. तर विल यंग 6 रन्स करून परतला. वन डाउन आलेल्या हेन्री निकोल्सने 11 रन्सची खेळी केली. तर टॉम लथमने केवळ 7 रन्सचे योगदान दिले. फॉर्ममध्ये असणारा ग्लेन फिलिप्स शून्यावर आउट झाला.
डॅरिल मिचेल आणि मिशेल सँटनर यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळून धरला. डॅरिल मिचेल 55 रन्स करून आउट झाला. मिशेल सँटनरने 2 विकेट्स घेतल्या. काईल जेमिसन 7 रन्स करून आउट झाला.
IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर
भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडची अक्षरश: वाट लावली. 50 रन्समध्ये भारताच्या गोलंदाजांनी त्यांचे पाच महत्वाचे फलंदाज आउट केले. औकिब नबीने अचूक गोलंदाजी करत महत्वाच्या 2 विकेट पटकावल्या. तर अंशुल कंबोजने एक विकेट घेतली. गूरनूर ब्रारने कमाल गोलंदाजी केली. त्याने मेडन ओव्हर टाकत महत्वाच्या दोन विकेट्स पटकावल्या. त्यामुळे न्यूझीलंडचे फलंदाज भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे नतमस्तक झाल्याचे दिसून आले. गुरनूर ब्रारने 3 विकेट्स घेतल्या.
Auqib Nabi on fire in Wellington 🔥 Both NZ openers gone as KL Rahul takes a fine catch to hand Nabi his second wicket 👏 Updates ▶️ https://t.co/pxZRYf6dYV #TeamIndia | #NZvIND https://t.co/gDnt2wmLIz — BCCI (@BCCI) November 7, 2026
आजचा सामना पावसामुळे थोडासा उशिरा सुरू झाला. त्यामुळे 50 ओव्हर्स ऐवजी आता हा सामना प्रत्येकी 47 ओव्हर्सचा खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून भारत सिरीजमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर न्यूझीलंड पहिला विजय मिळवण्यासाठी धडपड करताना दिसणार आहे.
भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नमन धीर, अंशुल कंबोज, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग.
IND VS NZ: उद्या पाऊस नसला तर मैदानात धुरळा उडणार! भारत-न्यूझीलंड सामना ‘या’ ठिकाणी पहा फ्री…
न्यूझीलंड: टिम सेफर्ट, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.
Ans: गूरनूर ब्रारने मेडन ओव्हर टाकत 2 विकेट्स पटकावल्या.
Ans: बहर्तणे 25 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा अर्धा संघ आउट केला होता.






