Champion Trophy 2025: Hardik Pandya breaks King Kohli's record; does 'this' big feat..
Champion Trophy 2025 : 9 मार्च रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सचे पराभव केला आहे. विजेतेपद जिंकून भारतीय संघ आपल्या मायदेशात परतला आहे. परंतु, तरीही चाहते अजून देखील या स्पर्धेतील भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना दिसत आहे. अशातच आणखी एक नवीन गोष्ट समोर आली आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने स्टार फलंदाज विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला आहे.
वास्तविक, हार्दिक पांड्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील संपूर्ण स्पर्धेत बॅटसोबतच त्याने बॉलने देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच अनेक विक्रम रचले नाही तर सोशल मीडियावरही विक्रम केले आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि काही मिनिटांतच लाईक्सची संख्या लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान, त्याने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम देखील मोडला आहे.
फायनल जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह खेळपट्टीवर गेला आणि त्याने अक्षर पटेललाही सोबत घेतले आहे. जेणेकरून त्याचा फोटो काढता येईल. तसेच अनेक कॅमेरामनही तेथे पोहोचले. पांड्याने खेळपट्टीवर ट्रॉफीसह आपली प्रतिष्ठित पोझ दिली, जी त्याने 2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर देखील केली होती. हार्दिक पांड्याच्या या पोस्टला अवघ्या 6 मिनिटांत 1 मिलियन लाइक्स मिळाले आहेत, हा एक नवा विक्रम ठरला आहे.
HARDIK PANDYA – THE FASTEST INDIAN TO HIT 1M LIKE ON INSTRAGRAM. 🤯 – 1M Like In just 6 minutes….!!!! 🔥 pic.twitter.com/llCQGK8XJ4 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 12, 2025
यापूर्वी इंस्टाग्रामवर सर्वात जलद 1 मिलियन लाईक्सचा विक्रम विराट कोहलीच्या नावे होता. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच्या पोस्टला 7 मिनिटांत 1 दशलक्ष लाईक्स मिळाले होते. अशा परिस्थितीत पांड्या आता कोहलीच्या पुढे गेला आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही त्याचे खूप कौतुक केल्याचे दिसून येत आहे.
हार्दिक पांड्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सध्या 38.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच तो स्वत: 364 अकाउंटला फॉलो करतो. 6 मिनिटांत 1 दशलक्ष लाईक्स मिळालेल्या पोस्टला बातमी लिहिपर्यंत 16.5 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. या पोस्टवर 3 लाखांहून अधिक कमेंट्स आहेत.
हेही वाचा : Shahid Afridi: ‘पाकिस्तान क्रिकेट ‘ICU’त…’ ; शाहिद आफ्रिदीने आपल्याच क्रिकेट बोर्डाला दिला घरचा आहेर..
भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला आहे. भारताने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.