Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya च्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह, Mumbai Indians च्या अधःपतनाला खराब नेतृत्व कारणीभूत; दिग्गजांची टीका

IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या चौथ्या पराभवानंतर मनोज तिवारी यांनी हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर टीका करत ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे म्हटले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 02:14 PM
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर उभे राहिले प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य - Instagram)

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर उभे राहिले प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई इंडियन्सवर जोरदार टीका 
  • सलग पराभवाचे खापर हार्दिकच्या कॅप्टन्सीवर 
  • हार्दिक पंड्याचे खराब नेतृत्व 
IPL 2026 मुंबई इंडियन्ससाठी एक मोठे संकट ठरत आहे आणि या संकटाच्या केंद्रस्थानी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आहे. पाच सामन्यांत चार मोठ्या पराभवांनंतर, या अनुभवी खेळाडूचा संयम आता संपत आला आहे. पंजाब किंग्सकडून घरच्या मैदानावर झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी हार्दिकच्या कर्णधारपदावर टीका केली आहे.

केवळ नेतृत्वच नाही तर हार्दिक पंड्याची संघातील इतर खेळाडूंसह असणारी वागणूकही सध्या समोर येत आहे. नुकतेच पंजाबविरूद्धच्या खेळात जसप्रीत बुमराहसह झालेले भांडण हे जगासमोर दिसून आले. तर हार्दिकने मैदानावर घेत असलेले निर्णय पाहता रोहित शर्मानेही डोक्याला हात लावलेला एका व्हिडिओत दिसून आला होता. यामुळे मुंबई इंडियन्सच्या अधःपतनाला हार्दिक पंड्यालाच जबाबदार धरलं जात आहे. 

MI Vs PBKS: नावातच ‘कॉक’ अन् खेळात ‘रॉक’; वादळी शतक करत पंजाबला केले चारी मुंड्या चीत

मुंबई इंडियन्सची बिकट अवस्था

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर संघर्ष करत आहे. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे निर्णय आणि संघातील समन्वय पूर्णपणे बिघडलेला दिसत आहे. गुरुवारी, वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर चिरडून या हंगामातील चौथा पराभव दिला.

मनोज तिवारींचा सडेतोड हल्ला

क्रिकबझवरील एका चर्चेदरम्यान, मनोज तिवारींनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्व क्षमतेवर जोरदार टीका केली. तिवारींच्या मते, हार्दिकने मुंबईचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून त्याचे मैदानातील निर्णय सामान्य दर्जाचे राहिले आहेत. त्यांनी असा युक्तिवाद केला की, पंजाबविरुद्धच्या सामन्यातही हार्दिकच्या गोलंदाजीतील रोटेशन आणि क्षेत्ररक्षणाच्या रणनीतीचा संघाला फायदा झाला नाही. मनोज तिवारी म्हणाले की, पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाकडून अशा दिशाहीन कामगिरीची अपेक्षा नव्हती आणि याचे थेट कारण हार्दिकच्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा अभाव किंवा दबाव हाताळण्याची असमर्थता हे आहे.

फक्त एक विजय आणि पराभवांची मालिका

मुंबई इंडियन्सची या हंगामातील अवस्था यावरून लक्षात येते की, त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या पाचपैकी चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईला या हंगामात आतापर्यंत मिळालेले एकमेव यश २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध मिळाले होते. पंजाब किंग्सविरुद्धच्या ताज्या पराभवामुळे मुंबईचा प्लेऑफचा मार्ग आधीच कठीण झाला आहे.

MI vs PBKS: ‘माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत…’ हताश हार्दिक पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी, मुंबईने केली निराशा

Web Title: Hardik pandya captaincy becomes the reason for mi poor performance manoj tiwari sharp attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2026
  • mumbai indians

संबंधित बातम्या

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
1

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
2

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
3

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
4

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.