Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेल सुटला अन् हार्दिकचा पारा चढला, BCCI ची मोठी कारवाई; MI Vs KKR सामन्यात नेमकं काय घडलं?

BCCI Fines Hardik Pandya: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला राग व्यक्त करणं महागात पडलं आहे. भरमैदानातील त्याच्या कृतीमुळे बीसीसीआयने त्याला दंड ठोठावला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 21, 2026 | 02:53 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • राग व्यक्त करणं हार्दिकला पडलं महागात
  • BCCI ने ठोठावला दंड
  • कोलकाताने मुंबईला चारली पराभवाची धूळ
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मैदानावर राग व्यक्त करणे महागात पडले आहे. आयपीएल २०२६ च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल हार्दिक पांड्याला दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयने हार्दिकवर कारवाई करत त्याच्या सामन्याच्या फीच्या १० टक्के दंडासह एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्याने आयपीएलच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’च्या लेव्हल-1 नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

झेल सुटल्यानंतर हार्दिक संतापला

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाच्या १० व्या षटकात, हार्दिकच्या गोलंदाजीवर रोव्हमन पॉवेलचा एक सोपा झेल सीमारेषेजवळ सुटला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर दिपक चाहर आणि रॉबिन मिन्झ यांच्यातील गोंधळामुळे दोघांपैकी कुणालाही झेल टिपता आला नाही. हा झेल सुटल्यानंतर हार्दिक स्पष्टपणे निराश दिसत होता. यानंतर, मनीष पांडेने हार्दिकच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार ठोकले. त्यामुळे संतप्त झालेल्या हार्दिकने आपल्या रन-अपकडे परत जाताना नॉन-स्ट्रायकर एंडवरील बेल्स जोरात उडवल्या. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यानंतर सामनाधिकारींनी कारवाई केली. आयपीएलच्या निवेदनात म्हटले आहे की, हार्दिक पांड्या हा आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत दोषी आढळला आहे. या कलमानुसार सामन्यादरम्यान क्रिकेट साहित्य, कपडे किंवा मैदानावरील फिक्स्चर आणि फिटिंग्सचा गैरवापर करणे हा नियमभंग मानला जातो. लेव्हल-1 उल्लंघनांमध्ये मॅच रेफरींचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. त्यानंतर, हार्दिकने आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरी राजीव सेठ यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे.

कोलकाताने मुंबईला चारली पराभवाची धूळ

बुधवारी (दि.२०) कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमधील ६5 वा सामना खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर चार विकेट्सने विजय मिळवला. मुंबईने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य केकेआरने १८.५ षटकांत पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना, मनीष पांडेने ३३ चेंडूंमध्ये ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. रोव्हमन पॉवेलने दोन षटकार आणि चार चौकारांसह ३० चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. कोलकाताने सात चेंडू शिल्लक असताना चार विकेट्सने मुंबईचा पराभव केला. हार्दिक दुखापतीमुळे मागील काही सामने खेळू शकला नव्हता. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहे.

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट

Web Title: Hardik pandya fined by bcci after angry reaction during mi vs kkr ipl 2026 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Hardik Pandya news
  • Kolkata Knight Riders
  • mumbai indians

संबंधित बातम्या

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!
1

Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्या मुंबईतच राहणार? KKR-सीएसकेच्या प्लॅनला मोठा धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.