रोहित शर्मा (फोटो - ians)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या वनडे सिरीजमध्ये भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने चाहत्यांची निराशा केली. शानदार, आक्रमक फटके मारण्यासाठी रोहित शर्मा प्रसिद्ध आहे. मात्र पहिल्या सामन्यात रोहित शर्मा शून्यावर आउट झाला. त्यातच आता न्यूझीलंडच्या जमिनीवर रोहित शर्माच्या एकदिवसीय कारकिर्दीबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याने निराशा केली. एक ओव्हर देखील तो खेळू शकला नाही आणि शून्यावर आउट झाला. जगभरातील विविध मैदानांवर आपल्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा रोहित शर्माचा फॉर्म न्यूझीलंडच्या जमिनीवर संघर्ष करताना दिसून येतो. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या जमिनीवर अद्याप एकही शतक ठोकलेले नाही.
IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याच्यासाठी सध्या सुरू असलेली न्यूझीलंडविरुद्धची ही सिरीज त्याच्या कारकिर्दीची शेवटची सिरीज असण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आगामी वर्ल्ड कप खेळणार आहे. मात्र त्यानंतर तो न्यूझीलंडच्या दौऱ्यावर कधी येईल हे आताच सांगणे थोडेसे कठीण असणार आहे.
रोहित शर्माने जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. . त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत; परंतु ही दोन्ही शतके त्याने भारतामध्ये खेळताना ठोकली आहेत. न्यूझीलंडच्या स्थानिक मैदानांवर खेळताना रोहितच्या बॅटमधून अद्याप एकही शतक आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध एकूण ३५ सामन्यांच्या ३३ डावांत फलंदाजी करताना रोहित शर्माने ११३४ रन्स केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये रोहितने आतापर्यंत १५ सामन्यांच्या १४ डावांत फलंदाजी करत ४३७ रन्स केल्या आहेत.
IND Vs NZ: ‘रोहित भाईचा ‘तो’…’; शुभमन गिलने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, भारताचा शानदार विजय
Ans: भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा वनडे सामना शनिवारी होणार आहे.
Ans: न्यूझीलंडमध्ये रोहित शर्माने अद्याप एकही शतक केलेले नाही.






