ind vs pak U19 Asia cup 2026 Schedule
हे दोन्ही संघ गट टप्प्यात आमनेसामने येणार आहेत. या दिवाळीत, टीम इंडिया पाकिस्तानला हरवून चाहत्यांना एक मोठी भेट देण्याची तयारी असेल. दोन्ही संघांमधील महामुकाबला कधी आणि कुठे खेळला जाईल. तसेच, सामना किती वाजता सुरू होईल, जाणून घ्या.
अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघातील, रोमांचक सामना रविवार, ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे दोन्ही संघ ओमानमधील अल अमेरत स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकतील. याच दिवशी भारतातही दिवाळीचा पवित्र सण साजरा होणार आहे. याचा अर्थ क्रिकेटच्या मैदानावरही फटाक्यांचा आवाज ऐकू येईल. जर भारतीय संघ जिंकला, तर टीम इंडिया मोठ्या विजयाने प्रेक्षकांना दिवाळीची भेट देईल. दोन्ही संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. अर्धा तास आधी, दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरतील. चाहते हा महासंग्राम सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकतात.
भारतीय संघाने अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने नेपाळला १० विकेट्सने पराभूत केले. नेपाळने प्रथम फलंदाजी केली आणि एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केरत नेपाळच्या संपूर्ण संघाला १२८ धावांवर गुंडाळले.
प्रत्युत्तरात, भारतीय संघाने एकही विकेट न गमावता अवघ्या १९.१ षटकांत लक्ष्य गाठून सामना जिंकला. भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवागचा मुलगा, आर्यवीर सेहवागने पुन्हा एकदा शानदार फलंदाजी केली. त्याने ५२ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा करून सर्वांची मने जिंकली. कर्णधार लक्ष्य रायचंदानीनेही शानदार फलंदाजी करत नाबाद ५३ धावा केल्या. भारताने या सामन्यात शानदार विजय मिळवला.






