Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya असेल ट्रेंडिंगचा विषय; मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टला सोडावे, आकाश चोप्राचा अजब गजब सल्ला

Hardik Pandya : आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल होण्याची शक्यता. हार्दिक पांड्याच्या संभाव्य ट्रेडवर चर्चा सुरू असताना ट्रेंट बोल्टला रिलीज करण्याचा सल्ला आकाश चोप्रांनी दिला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 10, 2026 | 02:45 PM
Hardik Pandya असेल ट्रेंडिंगचा विषय; मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टला सोडावे, आकाश चोप्राचा अजब गजब सल्ला

Hardik Pandya असेल ट्रेंडिंगचा विषय; मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टला सोडावे, आकाश चोप्राचा अजब गजब सल्ला

Follow Us
Follow Us:
  • आकाश चौप्राचं हार्दिकला संघात ठेवण्याचा सल्ला
  • हार्दिक ऐवजी ट्रँट बोल्टला रिलीज करण्याचं मत
  • मुंबई इंडियन्सच्या निर्णयाकडे लक्ष
 

आयपीएल (IPL) 2027 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) संघाच्या रिटेन्शन आणि रिलीजच्या निर्णयांमध्ये हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) संभाव्य ट्रेडची महत्त्वाची भूमिका असेल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने व्यक्त केले आहे. हार्दिकला पंजाब किंग्जकडे पाठवून त्याच्या बदल्यात अर्शदीप सिंगला संघात घेण्याची चर्चा सुरू असताना चौप्राचे हे वक्तव्य समोर आले आहे.

एका संकेतस्थळाशी बोलताना आकाश चोप्रा म्हणाले की, मागील हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली झाली असती, तर संघात मोठे बदल करण्याची गरज भासली नसती. संघाकडे चांगले संतुलन, अनुभवी खेळाडू आणि मोठी क्षमता आहे. त्यामुळे भारतीय फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजाची गरज सोडली, तर फारसे बदल करण्याची आवश्यकता नव्हती.

हार्दिक सध्या ट्रेंडिंगवर

मात्र, सध्या हार्दिक पांड्याच्या ट्रेडची सर्वाधिक चर्चा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे रिटेन्शन आणि रिलीजचे निर्णय त्याच्याभोवती फिरतील. हार्दिकच्या बदल्यात दोन खेळाडू मिळू शकतात का, याचाही विचार संघाला करावा लागेल, असे चोप्रा यांनी नमूद केले.

चोप्रा यांनी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला संघातून रिलीज करण्याचा सल्लाही दिला. बोल्टची २०२६ मधील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. त्याने पाच सामन्यांत केवळ दोन विकेट घेतल्या. त्यासाठी मुंबई इंडियन्सने १२.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. या रकमेत अन्य चांगले खेळाडू संघात घेता येऊ शकतात, असे चोप्रा म्हणाले.

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…

बोल्टला रिलीज करण्याचा सल्ला

हार्दिक पांड्याबाबत बोलताना ते म्हणाले, “हार्दिक पांड्याचा निर्णय हा ट्रेडचा असेल, रिलीज किंवा रिटेन्शनचा नाही. त्याच्या बदल्यात खेळाडू मिळाले नाहीत, तर मुंबई इंडियन्सला त्याला संघात कायम ठेवावे लागेल. मात्र, ट्रेंट बोल्टला रिलीज करण्याबाबत कोणताही संभ्रम असण्याचे कारण नाही.”

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज आणि न्यूझीलंडचा मिचेल सँटनर हे दोघेही डावखुरे फिरकीपटू असल्याने त्यांच्यापैकी एकाला रिलीज करण्याची गरज असल्याचेही चोप्रा यांनी सांगितले. आपण केशव महाराजलाही संघातून सोडू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

 

 

Web Title: Hardik pandya trade trent boult release aakash chopra rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2027

संबंधित बातम्या

IPL 2027 लिलावाआधी ट्विस्ट! Mumbai – Punjab मध्ये पडद्यामागे सर्वात मोठी डील; हार्दिक-अर्शदीपच्या ट्रेडवर शिक्कामोर्तब होणार?
1

IPL 2027 लिलावाआधी ट्विस्ट! Mumbai – Punjab मध्ये पडद्यामागे सर्वात मोठी डील; हार्दिक-अर्शदीपच्या ट्रेडवर शिक्कामोर्तब होणार?

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा
2

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर
3

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर

IPL 2027 आधी CSK-SRH चा गेमप्लॅन? ‘या’ चार खेळाडूंची ट्रेड डील फिक्स; कोणाचा पत्ता कट?
4

IPL 2027 आधी CSK-SRH चा गेमप्लॅन? ‘या’ चार खेळाडूंची ट्रेड डील फिक्स; कोणाचा पत्ता कट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.