Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा

Mumbai Indians To Announce Rohit Sharma As Captain: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२७ साठी संघात अनेक बदल केले आहेत. त्यातच आता , रोहित शर्माची कर्णधार म्हणून पुन्हा नियुक्ती होऊ शकते, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 07, 2026 | 09:23 PM
Rohit Sharma MI Captain in Ipl 2027

Rohit Sharma MI Captain in Ipl 2027

Follow Us
Follow Us:
  • हार्दिक पांड्याला मोठा धक्का?
  • रोहित शर्मा पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार
  • शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
IPL 2027: रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. परंतु, हार्दिक पांड्याच्या आगमनानंतर, २०२४ मध्ये रोहित शर्माला कर्णधारपद सोडावे लागले. हार्दिकच्या काळात संघाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे.

कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याला अनेक मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. परिणामी संघ क्वालिफाय होऊ शकला नाही. काही वृत्तांनुसार, हार्दिक मुंबई सोडून दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये सामील होऊ शकतो. यामुळे मग प्रश्न असा निर्माण होतो की मुंबईचा पुढचा कर्णधार कोण असेल. सध्याच्या वृत्तांनुसार, संघाची सूत्रे रोहितच्या हाती दिली जाऊ शकतात. पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याचे कर्णधार म्हणून पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे. (Rohit Sharma)

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं

रोहित पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?

वृत्तानुसार, हार्दिक पांड्या पंजाब किंग्स संघात सामील होऊ शकतो. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याची ट्रेड डिल होऊ शकते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुंबई संघ पुढील वर्षीच्या आयपीएल हंगामासाठी रोहित शर्माला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करू शकतो. फ्रँचायझी १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी यापूर्वीच म्हटले होते की, रोहितने त्याच्या अनुभवाच्या आधारावर मुंबईचा कर्णधार बनावे. अशा परिस्थितीत, फ्रँचायझी रोहितला मोठी जबाबदारी देऊ शकते. हार्दिक पांड्याने २०२४ ते २०२६ या काळात सलग तीन हंगामांसाठी मुंबईचे कर्णधारपद भूषवले होते. या काळात संघाला मोठ्या उलथापालथीचा सामना करावा लागला.

मुंबईचा नवीन कोचिंग स्टाफ

हार्दिकच्या ट्रेडबाबत चर्ता सुरु असतानाच, मुंबई संघात मोठे बदल झाले आहेत. संघाने सहा वर्षांत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. यामुळे फ्रँचायझी एका नव्या सुरुवातीच्या शोधात आहे. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी १७ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला. यानंतर, वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू कायरोन पोलार्ड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलार्ड अनेक वर्षांपासून मुंबईत कार्यरत आहेत.

याव्यतिरिक्त, माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिचेल मॅकक्लेनघन यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून, तर धवल कुलकर्णी यांची विकास गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टी. दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलार्ड नवीन प्रमुख झाल्याबरोबरच, रोहित नवीन कर्णधार होऊ शकतो अशा अफवा पसरू लागल्या. त्यामुळे येत्या काही दिवसात याचे चित्र स्पष्ट होईल.

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर

Web Title: Ipl 2027 mumbai indians to announce rohit sharma new captain pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Kieron Pollard
  • MI Captain Rohit Sharma
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं
1

IND vs NZ: हिटमॅनचा मैदानावर धुमाकूळ! रोहित शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम; शाहिद आफ्रिदीला पछाडलं

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर
2

Hardik Pandya: हार्दिकला धक्क्यांवर धक्के! कमबॅकला पुन्हा ब्रेक; आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतूनही बाहेर

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर
3

IND Vs NZ: किवी अन् ‘रो-को’च्या आधी पावसाची बॅटिंग; नेमका सामना कधी सुरू होणार? वाचा सविस्तर

Mumbai Indians : …मग हार्दिक पंड्याने कर्णधारपद सोडावे, अंबाती रायडूचा महत्त्वाचा सल्ला
4

Mumbai Indians : …मग हार्दिक पंड्याने कर्णधारपद सोडावे, अंबाती रायडूचा महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.