
हरमनप्रीत कौरची WPL मोठ्या विक्रमाला गवसणी! (Photo Credit- X)
गुजरात जायंट्सने विजयासाठी दिलेल्या १९३ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात संथ झाली होती. मात्र, हरमनप्रीत कौर मैदानात उतरताच सामन्याचे चित्र बदलले. तिने अवघ्या ४३ चेंडूंमध्ये नाबाद ७१ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत तिने ७ चौकार आणि २ उत्तुंग षटकार खेचले. तिच्या या १६५.१२ च्या स्ट्राईक रेटमुळे मुंबईने हे कठीण लक्ष्य ७ गडी राखून सहज गाठले.
Harmanpreet Kaur has become only the second player to reach 1000 runs in the WPL🔥 The first was her teammate Nat Sciver-Brunt 👏#WPL2026 #WPL pic.twitter.com/cWoxhBZqmF — Cricbuzz (@cricbuzz) January 13, 2026
अशी फिल्डिंग पाकिस्तानीच करू शकतात! जगभरात पुन्हा नाचक्की, पहिले बाबर-रिझवान आणि आता हसन अली
या सामन्यासह हरमनप्रीतने एकाच वेळी अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हरमनप्रीत आता डब्ल्यूपीएलमध्ये १००० पेक्षा जास्त धावा करणारी पहिली भारतीय आणि एकूण दुसरी खेळाडू ठरली आहे. (मुंबईच्याच नेट सायव्हर-ब्रंटच्या नावावर १०००+ धावा आहेत). सर्वाधिक धावांच्या बाबतीत हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज मेग लॅनिंगला मागे टाकले आहे.
डब्ल्यूपीएलमध्ये सर्वाधिक १० अर्धशतके झळकावण्याचा मान आता हरमनप्रीतला मिळाला आहे. तिने मेग लॅनिंग आणि नेट सायव्हर-ब्रंट (प्रत्येकी ९ अर्धशतके) यांचा विक्रम मोडीत काढला.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली होती. पहिल्या सामन्यात आरसीबीकडून पराभूत झाल्यानंतर संघ दबावाखाली होता. मात्र, त्यानंतर मुंबईने सलग दोन सामने जिंकून गुणतालिकेत (Points Table) दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, प्रमुख खेळाडू नेट सायव्हर-ब्रंट दुखापतीमुळे बाहेर असतानाही हरमनप्रीतने संघाची धुरा समर्थपणे सांभाळली.