Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs NZ Head to Head: सेमीफायनलची रणधुमाळी! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड–दक्षिण आफ्रिका भिडणार; आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

SA vs NZ: उपांत्य फेरीचा सामना उद्या, ४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 03, 2026 | 05:09 PM
पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड–दक्षिण आफ्रिका भिडणार (Photo Credit- X)

पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड–दक्षिण आफ्रिका भिडणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला!
  • पाहा आकडेवारी आणि ‘हेड टू हेड’ रेकॉर्ड
  • कोणाचे पारडे जड?
SA vs ENG T20 WC 2026 Semi Final: टी-२० विश्वचषक २०२६ चा (T20 World Cup 2026) थरार आता निर्णायक वळणावर आला आहे. स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना उद्या, ४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (SA vs NZ) यांच्यात रंगणार आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिका हा या स्पर्धेतील एकमेव संघ आहे ज्याने अद्याप एकही सामना गमावलेला नाही.

‘हेड टू हेड’ रेकॉर्ड कोणाचे वर्चस्व?

टी-२० फॉरमॅटमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास दक्षिण आफ्रिकेचे पारडे न्यूझीलंडच्या तुलनेत जड दिसते. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १९ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी १२ सामन्यांत दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला केवळ ७ सामन्यांत विजय संपादन करता आला आहे.

टी-२० विश्वचषकात कोणाचा वरचष्मा?

विश्वचषकाच्या इतिहासातही दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व एकतर्फी राहिले आहे. आतापर्यंत विश्वचषकात हे दोन्ही संघ ५ वेळा आमनेसामने आले असून, पाचही वेळा दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे. मात्र, हे सर्व सामने साखळी फेरीतील होते. टी-२० विश्वचषकाच्या ‘नॉकआउट’ फेरीत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

दोन्ही संघांना पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा

न्यूझीलंडने आतापर्यंत सर्व टी-२० विश्वचषकांमध्ये सहभाग नोंदवला आहे. संघ तीन वेळा उपांत्य फेरीतून बाहेर पडला असून एकदा त्यांना अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेलाही अद्याप एकदाही हे जेतेपद पटकावता आलेले नाही. २०१४ आणि २००९ मध्ये त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता, तर २०२४ मध्ये भारताने अंतिम सामन्यात त्यांचा पराभव केला होता.

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

प्रोटियाज संघाचा यंदाचा फॉर्म

एडेन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २०२६ च्या विश्वचषकात आतापर्यंत अजिंक्य राहण्याची कामगिरी केली आहे. सुपर-८ फेरीत भारत, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांना धूळ चारून त्यांनी दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कर्णधार एडेन मार्करम जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने ७ सामन्यांत १७५ च्या स्ट्राईक रेटने २६८ धावा कुटल्या आहेत. रयान रिकेल्टननेही २२८ धावांचे योगदान दिले आहे, तर क्विंटन डी कॉक पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात करून देत आहे. लुंगी एनगिडीने ६ सामन्यांत १२ बळी घेत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणले आहे. त्याला कॉर्बिन बॉशची (११ बळी) उत्तम साथ मिळत आहे.

न्यूझीलंडची ताकद आणि रणनीती

दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही उत्कृष्ट लयीत दिसत आहे. रचिन रवींद्र हा फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत आहे. टिम सीफर्टने ६ सामन्यांत १५७ च्या स्ट्राईक रेटने २१६ धावा केल्या आहेत. मधल्या फळीत ग्लेन फिलिप्सने अनेकदा डाव सावरण्याची भूमिका चोख बजावली आहे.  मिचेल सँटनर, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन हे त्रिकूट दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकते. ईडन गार्डन्सच्या फिरकीला पूरक असणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचे फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. या हाय-व्होल्टेज सामन्यात कोणता संघ बाजी मारून फायनलचे तिकीट मिळवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भारत, इंग्लंड की दक्षिण आफ्रिका! T20 World Cup 2026 चे विजेतेपद कोण जिंकेल? एका माजी दिग्गजाने केली भविष्यवाणी

Web Title: New zealand vs south africa statistics and head to head record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • cricket news
  • SA vs NZ
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
1

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
3

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

Imam UL Haq: अरे जरा तरी लाज बाळगा! Fake Injury चा होणार तपास, आता घ्यावा लागणार वकिलाचा आधार, पाकिस्तान संघात भूकंप
4

Imam UL Haq: अरे जरा तरी लाज बाळगा! Fake Injury चा होणार तपास, आता घ्यावा लागणार वकिलाचा आधार, पाकिस्तान संघात भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.