Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ vs SA Semi-Final: पावसाचे सावट की धावांचा पाऊस? पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येतील. या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे मोठे आव्हान न्यूझीलंडसमोर असणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 03, 2026 | 09:17 PM
SA vs NZ पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट (Photo Credit- X)

SA vs NZ पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनलचा थरार!
  • दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान
  • पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट
NZ vs SA T20 WC Semi-Final Pitch And Weather Report: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता (T20 World Cup 2026) आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून, स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा (Semi-Final) महामुकाबला उद्या, ४ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (SA vs NZ) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येतील. या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे मोठे आव्हान मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडसमोर असणार आहे.

‘हेड टू हेड’ आकडेवारी

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत १९ वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने १२ सामन्यांत बाजी मारली आहे, तर न्यूझीलंडला केवळ ७ सामने जिंकता आले आहेत. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंडला अद्याप एकदाही दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आलेले नाही. आतापर्यंत झालेल्या ५ विश्वचषक लढतींमध्ये पाचही वेळा ‘प्रोटियाज’ संघ विजयी ठरला आहे.

ईडन गार्डन्सचा पिच रिपोर्ट (Pitch Report)

कोलकात्याचे ईडन गार्डन्स मैदान नेहमीच फलंदाजांसाठी नंदनवन राहिले आहे. येथील खेळपट्टीवर चेंडूला चांगला बाऊन्स मिळत असल्याने फलंदाजांना चौकार-षटकारांची आतिषबाजी करणे सोपे जाते. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६२ आहे, तर दुसऱ्या डावात ती १४३ पर्यंत खाली येते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.

SA vs NZ Head to Head: सेमीफायनलची रणधुमाळी! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड–दक्षिण आफ्रिका भिडणार; आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

हवामान अंदाज (Weather Update)

‘एक्यूवेदर’च्या अहवालानुसार, ४ मार्च रोजी कोलकात्यात पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. दिवसभर आकाश स्वच्छ राहील आणि कडक ऊन असेल. दिवसाचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण सामन्याचा आनंद घेता येईल.

दक्षिण आफ्रिकेची ‘विजयरथ’ कायम राखण्याची धडपड

या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका हा एकमेव असा संघ आहे ज्याने साखळी फेरीपासून सुपर-८ पर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सलग विजय मिळवत त्यांनी पाचव्यांदा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. कर्णधार एडेन मार्करम सध्या तुफान फॉर्ममध्ये असून त्याने ७ सामन्यांत १७५ च्या स्ट्राईक रेटने २६८ धावा कुटल्या आहेत. त्याला रयान रिकेल्टन (२२८ धावा) आणि अनुभवी क्विंटन डी कॉक (१७१ धावा) यांची उत्तम साथ लाभत आहे.लुंगी एनगिडीने ६ सामन्यांत १२ बळी घेत प्रतिस्पर्धी संघांना जेरीस आणले आहे, तर कॉर्बिन बॉशने ११ बळी घेतले आहेत. फिरकीपटू केशव महाराज देखील मधल्या षटकांत प्रभावी ठरत आहे.

न्यूझीलंडची ‘नॉकआउट’ मधील रणनीती

दुसरीकडे, न्यूझीलंडचा सुपर-८ मधील प्रवास संमिश्र राहिला. पाकिस्तानविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर इंग्लंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. असे असले तरी नॉकआउट सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ नेहमीच धोकादायक मानला जातो. सलामीवीर टिम सीफर्टने ६ सामन्यांत २१६ धावा करत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. अष्टपैलू रचिन रवींद्रने बॅट आणि बॉल दोन्हीने चमक दाखवली असून त्याने ११५ धावांसह ९ बळीही टिपले आहेत.

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

Web Title: New zealand will face a tough challenge from south africa in the semi finals know the condition of the pitch and weather

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • cricket news
  • SA vs NZ
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

RR vs KKR: कार्तिक त्यागी नावाचे वादळ, ईडन गार्डन्समध्ये कमाल; एकाच ओव्हरमध्ये ३ विकेट्स, 155 धावांमध्ये RR ला रोखले
1

RR vs KKR: कार्तिक त्यागी नावाचे वादळ, ईडन गार्डन्समध्ये कमाल; एकाच ओव्हरमध्ये ३ विकेट्स, 155 धावांमध्ये RR ला रोखले

RCB Green Jersey: हिरव्या रंगाची जर्सी घालून का खेळली RCB ची टीम, कसा आहे रेकॉर्ड
2

RCB Green Jersey: हिरव्या रंगाची जर्सी घालून का खेळली RCB ची टीम, कसा आहे रेकॉर्ड

Live सामन्यात मोबाईल वापरणे राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापकाला पडले महागात! BCCI ने सुनावली कठोर शिक्षा; तर वैभव सूर्यवंशीला…
3

Live सामन्यात मोबाईल वापरणे राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापकाला पडले महागात! BCCI ने सुनावली कठोर शिक्षा; तर वैभव सूर्यवंशीला…

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन
4

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.