
भारतीय संघाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारतीय संघाची फलंदाजी
भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डावाची सुरुवात करण्यासाठी शेफाली वर्मा आणि अनुष्का शर्मा मैदानात उतरला. अनुष्का शर्मा 28 रन्सची खेळी करून आउट झाली. तर निकी प्रसाद केवळ 9 रन्सची खेळी करून आउट झाला. शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. ती 69 रन्सची खेळी करून आउट झाली. रिचा घोष केवळ 1 रन करून आउट झाली. दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी आणि प्रेमा रावत देखील आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकल्या नाहीत. माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने 91 रन्सची शानदार खेळी केली.
IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका
झिम्बाबेची गोलंदाजी
झिम्बाबेच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. नोमवेलो सिबांडाने अनुष्का वर्माला तर न्याशा ग्वांझुराने निकी प्रसादला आउट केले. प्रिय बिझाने शेफाली वर्माला आउट केले. झिम्बाबेच्या गोलंदाजांनी शेवटच्या टप्प्यात चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमनप्रीत कौरने आक्रमक पवित्रा घेत शानदार खेळी केली. प्रिय बिझाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
भारतीय महिला संघ : स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा आणि क्रांति गौड.
IND Vs ZIM: क्लीन स्वीप देण्यासाठी Team India च्या वाघिणी सज्ज; तिसरा सामना कुठे आणि कधी?
झिम्बॉब्वे महिला संघ : केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्न मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिंडर चारे आणि तेंडाई मकुशा.