फोटो सौजन्य - Olympic Khel सोशल मिडीया
पॅरा आर्चर हरविंदर सिंह : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचे पॅरा खेळाडू दमदार कामगिरी करत आहे. पॅरिस पॅरालिम्पिक या सात दिवसांमध्ये भारताने 20 चा आकडा पार केला आहे. यामध्ये 4 सुवर्ण, 8 रौम्य आणि 10 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताचा पॅरा आर्चर हरविंदर सिंहने पोलंडच्या तिरंदाजाला पराभूत करून पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील ऐतिहासिक गोल्ड मेडल नावावर केलं. हरविंदर सिंहने पोलंडचा तिरंदाज लुकाझ सिझेक याला सलग तीन गेम मध्ये पराभूत करून सुवर्ण पदकावर कब्जा केला. यामध्ये पहिला गेम 28-24 असा नावावर केला त्यानंतर दुसरा गेम 28-27 जिंकला. शेवटचा खेळ 29-25 जिंकून गोल्ड मेडल नावावर केले.
भारताने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या सातव्या दिवशी चार मेडल नावावर केले आहेत. यामध्ये सचिन खिलारीने रौम्य पदक जिंकले तर हरविंदर सिंहने गोल्ड मेडलवर कब्जा केला आहे. त्याचबरोबर धरमबिर आणि प्रणव सुरमा यांनी मेन्स क्लब थ्रोमध्ये दोन मेडल नावावर केला आहे. भारताचा भालाफेकपटू सचिन खिलारीने 40 वर्षानंतर भालाफेकमध्ये मेडल नावावर केले, त्याचे सुवर्ण पदक 2 सेमीने हुकले. हरविंदरसिंहने तिरंदाजीमध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये पहिले मेडल जिंकलं.
The exact moment where Harvinder scripted History for India at Paralympics 🇮🇳❤️
🎥 – Paralympicspic.twitter.com/9hNJd4sycc
— The Khel India (@TheKhelIndia) September 5, 2024