Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लट्ठ गाड़ दिया! Haryana च्या वाघिणींनी पुणे हादरवले; हॉकी इंडिया स्पर्धेत झारखंडला लोळवले

अंतिम सामन्यात हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांच्यात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली. हॉकी झारखंडने आक्रमक सुरुवात करत मुंद्री सरोजने १९व्या मिनिटाला गोल नोंदवत हॉकी हरियाणाला धक्का दिला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 24, 2026 | 02:31 PM
haryana hockey team

haryana hockey team

Follow Us
Follow Us:
  • हरियाणा हॉकी संघाला राष्ट्रीय स्पर्धेचे अजिंक्यपद
  • झारखंडवर २-१ अशी पिछाडीवरून मात करत पटकावले विजेतेपद
  • हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांच्यात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत
पुणे: हॉकी हरियाणाने हॉकी झारखंडवर २-१ अशी शानदार पिछाडीवरून मात करत १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये अजिंक्यपद पटकावले. नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर रविवारी झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात हॉकी हरियाणाने दमदार पुनरागमन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेचे आयोजन हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली हॉकी महाराष्ट्रातर्फे करण्यात आले असून ही स्पर्धा हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. भारतीय स्टेट बँक हे स्पर्धेचे प्रस्तुतकर्ता प्रायोजक असून युनियन बँक ऑफ इंडिया पॉवरिंग पार्टनर आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स अधिकृत भागीदार, बिसलेरी हायड्रेशन पार्टनर, तर अस्वानी असोसिएट्स आणि सुहाना मसाला हे सपोर्ट पार्टनर्स आहेत.

‘Hockey स्पर्धेत उडाली खळबळ! फायनलच्या ट्रॉफीवर कोण कोरणार नाव? झारखंड की हरियाणा?

रोमांचक अंतिम लढत

अंतिम सामन्यात हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांच्यात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली. हॉकी झारखंडने आक्रमक सुरुवात करत मुंद्री सरोजने १९व्या मिनिटाला गोल नोंदवत हॉकी हरियाणाला धक्का दिला. मात्र, पिछाडीवर पडलेल्या हरियाणाने शानदार पुनरागमन करत दुसऱ्या सत्रात सामन्यावर पकड मिळवली. भाव्याने २३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले; मात्र कोणत्याही संघाला यश आले नाही. चौथ्या सत्राच्या सुरुवातीलाच खुशीने ४२व्या मिनिटाला निर्णायक गोल करत हॉकी हरियाणाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखत हॉकी हरियाणाने प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले.

हॉकी मध्य प्रदेश संघाला कांस्यपदक

तृतीय क्रमांकाच्या सामन्यात हॉकी मध्य प्रदेशने छत्तीसगड हॉकीवर ३-१ असा विजय मिळवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले आणि मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता. मात्र, दुसऱ्या सत्रात हॉकी मध्य प्रदेशने सामन्याची दिशा बदलली. काजलने ३५व्या आणि ३७व्या मिनिटाला सलग दोन गोल करत मध्य प्रदेशला आघाडी मिळवून दिली. हे दोन्ही गोल पेनल्टी स्ट्रोकवर झाले. त्यानंतर तन्वीने ४२व्या मिनिटाला तिसरा गोल करत मध्य प्रदेशची आघाडी ३-० अशी भक्कम केली. छत्तीसगड हॉकीकडून शीतल यादवने ५४व्या मिनिटाला एक गोल परत केला; मात्र त्यानंतर मध्य प्रदेशने बचाव भक्कम ठेवत ३-१ असा विजय निश्चित केला.

Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम

भव्य पारितोषिक वितरण समारंभ

पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारचे नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक तथा हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष कृष्ण प्रकाश होते. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवडचे महापौर तथा आयोजन समितीचे अध्यक्ष रवि लांडगे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

Web Title: Haryana team jharkhand team 2 1 in hockey india womens international competition 2026 pimpri pune sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Hockey
  • Jharkhand
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी
1

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
2

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड
3

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
4

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.