Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत! भारतमातेसाठी जिद्दीला पेटली अन्…; जलतरणपटू गीताने रचला ‘हा’ रेकॉर्ड

Swimming: या मोहिमेदरम्यान गीताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इंग्लिश चॅनेलच्या जलतरणादरम्यान त्यांना जेलीफिशचा दंश झाला. त्यानंतरही तयारी सुरू ठेवत ती पुढील आव्हानांना सामोरे गेली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 08, 2026 | 05:02 PM
Swimmer Geeta Malusare

Swimmer Geeta Malusare

Follow Us
Follow Us:
  • ‘ट्रिपल क्राउन’ पटकावणारीपहिली भारतीय महिला
  • ९६ दिवसांत तीन खडतर स्विम्स
  • गीता महेश मालुसरेने केला ऐतिहासिक विक्रम 
पुणे/Swimming: पुण्यातील ओपन वॉटर जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने अवघ्या ९६ दिवसांत इंग्लिश चॅनेल, कॅटालिना चॅनेल आणि न्यूयॉर्कमधील ‘२० ब्रिजेस स्विम’ पूर्ण करून ‘ओपन वॉटर स्विमिंग (Sports) ट्रिपल क्राउन’ पटकावला. हा किताब मिळविणारी ती भारतातील पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. कमी कालावधीत ट्रिपल क्राउन पूर्ण करणारी ती जगातील सहावी आणि आशियातील दुसरी महिला ठरली आहे.

गीता मालुसरेने जगातील सात प्रमुख ओपन वॉटर स्विम्स पूर्ण करून ‘क्वीन ऑफ ओशन’ हा बहुमान मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे. या मोहिमेतील पहिला टप्पा तिने इंग्लिश चॅनेल पार करून पूर्ण केला. त्यानंतर अमेरिकेतील कॅटालिना चॅनेल त्यांनी १५ तास ४२ मिनिटांत पार केला. कॅटालिना चॅनेल पूर्ण करणारी ती भारतातील पाचवी महिला ठरली होती. त्यानंतर न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन बेटाभोवतीची सुमारे ४६ किलोमीटरची ‘२० ब्रिजेस स्विम’ तिने ९ तास ३२ मिनिटांत पूर्ण केली. या तीनही आव्हानात्मक जलतरण मोहिमा ९६ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करत त्यांनी ‘ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन’ आपल्या नावावर केला.

India Record : ‘या’ 6 वर्षीय चिमुकलीचा विक्रम पाहिलात का? भल्याभल्यांनाही जमलं नाही ते तिने करून दाखवलं

जेलीफिशचा दंश, हाताला दुखापत; तरीही माघार नाही 

या मोहिमेदरम्यान गीताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इंग्लिश चॅनेलच्या जलतरणादरम्यान त्यांना जेलीफिशचा दंश झाला. त्यानंतरही तयारी सुरू ठेवत ती पुढील आव्हानांना सामोरे गेली. कॅटालिना चॅनेलच्या जलतरणादरम्यान दोन्ही हातांना दुखापत झाली. मात्र, अनेक महिन्यांची तयारी, घेतलेले कष्ट आणि या मोहिमेचे ध्येय लक्षात घेता त्यांनी माघार घेतली नाही.

माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता

“प्रत्येक स्विमने मला नवा धडा दिला आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत केले. या प्रवासातील वेदना, त्याग आणि अडचणी असूनही माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता,” असे गीताने सांगितले. या कामगिरीसाठी कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याचे त्यांनी विशेष उल्लेख केला. वडील, आई, आजी आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षक प्रतीक जावडेकर आणि शेखर खासनीस यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दलही तिने कृतज्ञता व्यक्त केली.

पाण्याचा प्रवाह देखील झुकला! अवघ्या १३व्या वर्षी ८१ किलोमीटरचा जलप्रवास; विदी भोरने 11 तास अन्…

‘२० ब्रिजेस स्विम’साठी प्रायोजकत्व दिल्याबद्दल वेंकीज (Venkys) आणि क्रांती रिअल्टर्स यांचे त्यांनी आभार मानले. तसेच अमेरिकेतील मोहिमेदरम्यान मदत करणाऱ्या प्रीती सावंत जाधव, सुदीप जाधव, राजवीर जाधव, कौस्तुभ हळबे आणि वैष्णवी कुडले यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. “हे यश केवळ माझे नाही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांचे प्रेम, त्याग, प्रोत्साहन आणि पाठिंबा यामुळे हा प्रवास शक्य झाला,” अशी भावना गीता मालुसरे यांनी व्यक्त केली.

Web Title: Swimmer geeta malusare wins tripple corwn first indian lady sports pune news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News
  • swimmer
  • Swimming

संबंधित बातम्या

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,
1

Asian Games 2026: इंडियन आर्मीचा नाद करायचा नाही! पुण्यातील खेळाडूंनी जिंकली तब्बल…,

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल
2

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड
3

Handball Tournament: अजित-ओमची भरारी! गुरुकुलच्या दोन शिलेदारांची थेट महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात निवड

India Record : ‘या’ 6 वर्षीय चिमुकलीचा विक्रम पाहिलात का? भल्याभल्यांनाही जमलं नाही ते तिने करून दाखवलं
4

India Record : ‘या’ 6 वर्षीय चिमुकलीचा विक्रम पाहिलात का? भल्याभल्यांनाही जमलं नाही ते तिने करून दाखवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.