Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात रंगणार कुस्तीचा महासंग्राम! २२ वर्षांनंतर ‘हिंदकेसरी’चे यजमानपद; विजेत्या मल्लावर होणार बक्षिसांचा वर्षाव

Hind Kesari Kushti 2026: पंतप्रधान मोदींच्या इंधन बचती आणि वर्क फ्रॉम होमच्या आवाहनावर रोहित पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. "आधी स्वतःची उधळपट्टी थांबवा" म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 11, 2026 | 06:47 PM
साताऱ्यात रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

साताऱ्यात रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Follow Us
Follow Us:

 

  • साताऱ्यात रंगणार कुस्तीचा महासंग्राम!
  • २२ वर्षांनंतर ‘हिंदकेसरी’चे यजमानपद
  • विजेत्या मल्लावर होणार बक्षिसांचा वर्षाव
सातारा दि. ११ (प्रतिनिधी): साताऱ्याच्या क्रीडा इतिहासात मानाचा ठरणारा ५२ वा हिंदकेसरी पुरुष व महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांचा महासोहळा यंदा साताऱ्यात रंगणार असून, १४ ते १७ मे दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम येथे देशभरातील अव्वल मल्लांच्या झुंजी पाहायला मिळणार आहेत. भारतीय शैली कुस्ती महासंघ, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल २२ वर्षांनंतर साताऱ्याला पुन्हा हिंदकेसरी स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याने जिल्ह्यातील कुस्ती रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत संयोजन समितीचे निमंत्रक दीपक पवार, राजेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर पवार, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन खोपडे तसेच राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलालजी उपस्थित होते.

साहेबराव पवार यांच्या स्मरणार्थ आयोजन

साताऱ्याचे ज्येष्ठ पैलवान आणि क्रीडामहर्षी साहेबराव पवार (भाऊ) यांच्या शताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दीपक पवार यांनी दिली. साताऱ्याला लाभलेल्या समृद्ध कुस्ती परंपरेची आठवण करून देताना त्यांनी खाशाबा जाधव, श्रीरंग अप्पा जाधव, बाबुराव चव्हाण, मारुती वडार, शामराव मुळीक, निजाम पैलवान आणि बळीराम चौकवले यांसारख्या दिग्गज मल्लांचा उल्लेख केला.

२८ राज्यांतील मल्लांचा सहभाग

या स्पर्धेत देशातील २८ राज्यांमधून सुमारे ६०० पुरुष आणि २५० हून अधिक महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील पंच आणि अधिकारीही स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे महिला हिंदकेसरी स्पर्धांनाही यंदा विशेष महत्त्व देण्यात आले असून, तब्बल ३०० महिला कुस्तीपटू साताऱ्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था यशोदा शिक्षण संस्थेमध्ये करण्यात आली आहे.

Maharashtra Politics : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीवरून जावळी पंचायत समितीत खडाजंगी; शिल्पा शिंदेंसह सदस्य आक्रमक

लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसांची घोषणा केली आहे. पुरुष हिंदकेसरी गटातील विजेत्यास थार गाडी आणि एक किलो चांदीची गदा देण्यात येणार असून उपविजेत्यास ट्रॅक्टर, तृतीय क्रमांकाला बुलेट आणि चतुर्थ क्रमांकाला दुचाकी वाहन दिले जाणार आहे.
महिला हिंदकेसरी गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास दुचाकी वाहन, द्वितीय क्रमांकाला ५० हजार रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. इतर वजनी गटांतील विजेत्यांनाही चारचाकी वाहन, अ‍ॅक्टिव्हा आणि रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

पाच कोटींच्या खर्चातून भव्य आयोजन

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, साताऱ्याच्या क्रीडा इतिहासातील हा सर्वात मोठा कुस्ती सोहळा ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. “हिंदकेसरी”सारखी प्रतिष्ठेची स्पर्धा साताऱ्यात होत असल्याने नागरिकांनी आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दीपक पवार आणि सुधीर पवार यांनी केले.

साताऱ्यात पुन्हा एकदा ‘पवार’ पॅटर्न! शरद पवारांच्या उपस्थितीत राजकीय खळबळ; ‘रयत’च्या बैठकीत बंद दाराआड जोरदार चर्चा

Web Title: Hind kesari wrestling championship 2026 satara schedule prizes news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Kusti
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड
1

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
2

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
3

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; कर्ज, वीजबिलात सवलत मिळणार, पण मदत बांधापर्यंत पोहोचणार का? शेतकऱ्यांचा सवाल
4

२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; कर्ज, वीजबिलात सवलत मिळणार, पण मदत बांधापर्यंत पोहोचणार का? शेतकऱ्यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.