Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

Cricket: पहिल्यांदा खेळणाऱ्या गॅरी कर्स्टन ॲकॅडमीचा डाव २५.२ षटकात १०७ धावांवर संपुष्टात आला. तनुजा वायबसे (नाबाद ३३ धावा) आणि राजनंदीनी (२२ धावा) यांनी संघाचा डाव सावरला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2026 | 05:14 PM
Pune Cricket Competition

Pune Cricket Competition

Follow Us
Follow Us:
  • एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एलिट ॲकॅडमी संघाचा विजय
  • ‘हिंदवी वॉरीयर्स करंडक‌’ वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धा 
  • एलिट, ओम साई संघांची विजयी सलामी
पुणे/Cricket: वॉरीयर्स स्पोर्ट्‌स तर्फे आयोजित ‘हिंदवी वॉरीयर्स करंडक‌’ वरिष्ठ गट महिलांच्या आंतरक्लब एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एलिट ॲकॅडमी आणि ओम साई क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. फुरसुंगी येथील वॉरीयर्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आराध्या पवार हिने केलेल्या ६० धावांच्या जोरावर एलिट ॲकॅडमीने गॅरी कर्स्टन ॲकॅडमीचा सात गडी राखून सहज पराभव केला.

पहिल्यांदा खेळणाऱ्या गॅरी कर्स्टन ॲकॅडमीचा डाव २५.२ षटकात १०७ धावांवर संपुष्टात आला. तनुजा वायबसे (नाबाद ३३ धावा) आणि राजनंदीनी (२२ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. एलिट संघाच्या शुभ्रा चव्हाण हिने तीन गडी तर, अवनी पाटील हिने दोन गडी बाद केले. एलिट ॲकॅडमीने १९.२ षटकात हे लक्ष्य गाठले. आराध्या पवार हिने ५३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ६० धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने अवनी पाटील हिने २० धावा जमवून संघाचा विजय निश्चित केला.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

स्वराचे १९ धावांत पाच बळी

स्वरा शेंदूरकर हिने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ओम साई क्लबने रिक्रीएशन क्लबचा ५५ धावांनी पराभव करून विजयी सुरूवात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ओम साई क्लबने ४४.२ षटकात २१० धावा धावफलकावर लावल्या. सेहज कौर (४८ धावा), मानसी तिवारी (४२ धावा), मृदला आचार्य (३८ धावा) आणि तेजस्वीनी मोरे (२८ धावा) यांनी धावा जमवून संघाचा डाव उभा केला. रिक्रीएशनच्या स्वरा देशपांडे हिने चार गडी बाद केले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना रिक्रीएशन क्लबचा डाव ३६.१ षटकात १५५ धावांवर संपुष्टात आला. श्रृती गिते (४५ धावा), श्रीया तिकोणे (३९ धावा) आणि अक्क्षरा परदेशी (२१ धावा) यांनी धावा जमवून प्रतिकार केला. ओम साई संघाच्या स्वरा शेंदूरकर हिने १९ धावांत निम्मा संघ तंबुत पाठवला. दिव्या मेरगळ आणि आर्या वर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला सहज विजय मिळवून दिला. याआधी स्पर्धेचे उद्घाटन वॉरीयर्स स्पोर्ट्‌सचे संस्थापक युवराज शेवाळे, प्रतिक्षा शेवाळे आणि स्पर्धेचे संचालक स्वप्निल मोडक यांच्या हस्ते करण्यात आले.

सामन्यांचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी 

गॅरी कर्स्टन ॲकॅडमी : २५.२ षटकात १० गडी बाद १०७ धावा (तनुजा वायबसे नाबाद ३३, राजनंदीनी २२, अनन्या चव्हाण १९, शुभ्रा चव्हाण ३-२२, अवनी पाटील २-१६) पराभूत वि. एलिट ॲकॅडमीः १९.२ षटकात ३ गडी बाद १०८ धावा (आराध्या पवार ६० (५३, ७ चौकार, १ षटकार), अवनी पाटील २०, ओवी वरदकर १-२९); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः आराध्या पवार

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

ओम साई क्लब : ४४.२ षटकात १० गडी बाद २१० धावा (सेहज कौर ४८, मानसी तिवारी ४२, मृदला आचार्य ३८, तेजस्वीनी मोरे २८, स्वरा देशपांडे ४-४५, सानिका लोकरे २-२९, श्रृती गिते २-३२) वि.वि. रिक्रीएशन क्लबः ३६.१ षटकात १० गडी बाद १५५ धावा (श्रृती गिते ४५, श्रीया तिकोणे ३९, अक्क्षरा परदेशी २१, स्वरा शेंदूरकर ५-१९, दिव्या मेरगळ २-९, आर्या वर्मा २-२२); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः स्वरा शेंदूरकर.

 

 

Web Title: Hindavi warriors trophy senior womens cricket tournament elite academywins match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Kabaddi: कबड्डी क्षेत्रात पुण्याचा दबदबा! आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले ‘हे’ मोठे विधान
1

Kabaddi: कबड्डी क्षेत्रात पुण्याचा दबदबा! आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले ‘हे’ मोठे विधान

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री
4

Tennis: पुण्यातील टेनिस स्पर्धेत युवा खेळाडूंची दमदार कामगिरी; ‘या’ सहा जणांची मुख्य फेरीत एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.