Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey World Cup 2026: ४४ व्या मिनिटाला Michel Struthoff चा ‘मॅजिक टच’! एकमेव गोल ठरला गेमचेंजर; जर्मनी पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन

Germany won Hockey World Cup 2026 Beat Spain: जर्मनीने हॉकी विश्वचषक २०२६ चा अंतिम सामन्यात स्पेनला पराभूत केले. यासह सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 31, 2026 | 03:13 PM
Germany won Hockey World Cup 2026

Germany won Hockey World Cup 2026

Follow Us
Follow Us:
  • फायनलमध्ये जर्मनीचा धुमाकूळ
  • स्पेनचा गेम ओव्हर
  • हॉकी वर्ल्ड कप २०२६चा किताब खिशात
हॉकी विश्वचषक २०२६ चा ( Hockey World Cup 2026 ) अंतिम सामना रविवार, ३० ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा सामना बेल्जियममधील वावर येथील बेल्फियस हॉकी एरिनामध्ये जर्मनी आणि स्पेन यांच्यात रंगला. या सामन्यात जर्मनीने उत्कृष्ट कामगिरी करत स्पेनला पराभूत करून विजेतेपद पटकावले. जर्मनीने स्पेनला १-० ने हरवून आपले विश्वचषक विजेतेपद कायम राखले. यासह जर्मनीने आपले चौथे हॉकी विश्वचषक विजेतेपद जिंकले.

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

४४ व्या मिनिटाला निर्णायक गोल

बेल्जियममधील वावर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी अनेक संधी निर्माण केल्या, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. पहिल्या १५ मिनिटांत जर्मनी आणि स्पेन या दोन्ही संघांना प्रत्येकी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण दोन्ही संघांना त्याचा फायदा उचलता आला नाही.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनने जर्मनीवर दबाव वाढवला आणि सतत हल्ले चढवले. ४४ व्या मिनिटाला मायकेल स्ट्रुथॉफने सामन्यातील एकमेव गोल केला.मायकेलने उजवीकडून मिळालेल्या पासचे गोलमध्ये रूपांतर करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, बरोबरी साधण्यासाठी स्पेनने आपली सर्व शक्ती पणाला लावली. शेवटच्या मिनिटांमध्ये, संघाने गोलकीपरला बाहेर काढून एका अतिरिक्त आक्रमक खेळाडूसह खेळण्याचा निर्णय घेतला, पण जर्मन डिफेन्स भेदण्यात स्पेनला अपयश आले.

4-TIME WORLD CHAMPIONS!!!! 🇩🇪 🏆 🏆 🏆 🏆 🇩🇪 Die Honamas defend their World Cup and join Pakistan as the most successful side in the history of the Men’s FIH Hockey World Cups, with 4 titles to their name!!#HWC2026 #HockeyWorldCup2026 #WorldCup #WorldChampions #Germany pic.twitter.com/ofk5ZNOrl4 — International Hockey Federation (@FIH_Hockey) August 30, 2026

जर्मनीने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले

जर्मनीने यापूर्वी २०२३ चा हॉकी विश्वचषक जिंकला होता आणि आता त्यांनी २०२६ चे विजेतेपदही पटकावले आहे. हे जर्मनीचे सलग दुसरे विजेतेपद असून, त्यांनी पहिल्यांदाच आपल्या विजेतेपदाला डिफेन्ड केले आहे. या विजयासह जर्मनीने पाकिस्तानच्या चार हॉकी विश्वचषक विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जर्मनीनेही आता चार विजेतेपदे जिंकले आहे.

जर्मनीने केली पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी

या विजेतेपदासह, जर्मनीने पुरुष हॉकी विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विजेतेपदे पटकावणाऱ्या पाकिस्तान संघाची बरोबरी केली आहे. जर्मनीने यापूर्वी २००२ मध्ये क्वालालंपूर, २००६ मध्ये मॉन्शेनग्लाडबाख आणि २०२३ मध्ये भुवनेश्वर येथे विश्वचषक जिंकला होता. दुसरीकडे, पाकिस्तानने १९७१, १९७८, १९८२ आणि १९९४ मध्ये चार वेळा विश्वचषक जिंकला आहे. दुसरीकडे, स्पेन संघ मोठ्या प्रतीक्षेनंतर अंतिम फेरीत पोहोचला. या संघाने यापूर्वी १९९८ मध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता. हा त्यांचा एकूण तिसरा अंतिम सामना होता, परंतु पहिल्यांदाच विश्वविजेता बनण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

आतापर्यंत दोन्ही संघांची हेड टू हेड रेकॉर्ड ?

जर्मनी आणि स्पेन यांच्यात ३२ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी जर्मनीने १६, तर स्पेनने १० सामने जिंकले आहेत. इतकेच नव्हे, तर सहा सामने अनिर्णित राहिले आहेत. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये जर्मनीचे पारडे जड आहे.

IND vs THA: भारताची आशिया कपमध्ये दणक्यात सुरुवात! शफालीची वादळी खेळी अन् दीप्तीचा फिरकीचा कहर; टीम इंडियाने थायलंडला लोळवलं

Web Title: Hockey world cup 2026 germany beat spain won final fourth title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Germany
  • Hockey
  • Hockey World Cup 2026

संबंधित बातम्या

Hockey World Cup 2026: शेवटच्या क्षणी पलटला गेम! शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा ‘गेम ओव्हर’; अर्जेंटिनाने जिंकला हॉकी वर्ल्ड कप
1

Hockey World Cup 2026: शेवटच्या क्षणी पलटला गेम! शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा ‘गेम ओव्हर’; अर्जेंटिनाने जिंकला हॉकी वर्ल्ड कप

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…
2

भंगलं रे भंगलं! 51 वर्षांचे स्वप्न चक्काचूर; शेवटच्या सामन्यात बेल्जियमने केला भारताचा पराभव, थेट…

Hockey World Cup 2026: १७ मिनिटं अन् जर्मनीचा गेम ओव्हर! भारताचा दणदणीत विजय; ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी
3

Hockey World Cup 2026: १७ मिनिटं अन् जर्मनीचा गेम ओव्हर! भारताचा दणदणीत विजय; ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी

Hockey World Cup 2026: भारताचे वर्ल्ड कप स्वप्न भंगले! अर्जेंटिनाकडून दारुण पराभव; टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर
4

Hockey World Cup 2026: भारताचे वर्ल्ड कप स्वप्न भंगले! अर्जेंटिनाकडून दारुण पराभव; टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.