Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey World Cup 2026: १७ मिनिटं अन् जर्मनीचा गेम ओव्हर! भारताचा दणदणीत विजय; ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी

Indian Women's Team Beat Germany in Hockey world cup 2026: भारतीय महिला हॉकी संघाला २०२६ च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नसले तरी, त्यांनी शानदार कामगिरी करत जर्मनीला ३-१ ने पराभूत केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 28, 2026 | 01:41 PM
Hockey world cup 2026

Hockey world cup 2026

Follow Us
Follow Us:
  • महिला हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताचा दणदणीत विजय
  • जर्मनीला दिली मात
  • ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी
भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच महिला विश्वचषक २०२६ ( FIH Womens Hockey World Cup 2026) स्पर्धेच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीतून भारतीय महिला संघ बाहेर पडला. २७ ऑगस्ट रोजी भारतीय महिला संघ आणि जर्मनी महिला संघ पाचव्या स्थानासाठी आमनेसामने आले. या सामन्यात भारताने जर्मनीला ३-१ ने पराभूत करून पाचवे स्थान पटकावले. विश्वचषकातील गेल्या ५२ वर्षांतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी १९७४ मध्ये झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत भारताने चौथे स्थान मिळवले होते. भारताच्या विजयाची नायिका नवनीत कौर होती. नवनीतने दोन गोल करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, तर इशिकानेही या सामन्यात एक गोल केला.

Asia Cup 2026: आशिया कपसाठी ‘ब्लू ब्रिगेड’ सज्ज! हरमनप्रीतची ‘पलटण’ दुबईत दाखल; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला

शेवटच्या १७ मिनिटांत भारताने गेम पालटला

सामन्याच्या पहिल्या ४३ मिनिटांत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. यानंतर, भारताने पुढील १७ मिनिटांत तीन गोल करून सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले. ४३ व्या मिनिटाला, नेहाकडून पास मिळाल्यावर इशिकाने सर्कलमध्ये प्रवेश केला आणि रिव्हर्स हिटद्वारे जर्मन गोलकीपरच्या डोक्यावरून चेंडू गोलमध्ये टाकला. पुढच्याच मिनिटात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. नवनीतने ‘टच अँड स्लॅप’ टेकनिकचा वापर करून चेंडू गोलमध्ये टाकला आणि भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

भारताने जर्मनीला नमवले

४७ व्या मिनिटाला नवनीतने उत्कृष्ट कौशल्य दाखवत तिने चेंडूवर नियंत्रण मिळवले, आणि गोलरक्षकाला चकवत शॉट मारून भारताचा तिसरा गोल केला.तीन गोलांनी मागे पडल्यानंतर जर्मनीने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक पेनल्टी कॉर्नर मिळवले. परंतु, भारतीय गोलरक्षक बिचू देवी आणि बचावपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जर्मनीला बराच काळ रोखून धरले. जर्मनीला एकूण सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. ५९ व्या मिनिटाला लिन क्रिंग्जने मैदानी गोल करून जर्मनीसाठी खाते उघडले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारताने अंतिम शिट्टी वाजेपर्यंत आपली ३-१ अशी आघाडी कायम ठेवली.

टीम इंडियाची ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी

भारतीय महिला हॉकी संघाने गेल्या ५२ वर्षांतील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारतीय संघाने या स्पर्धेत एकूण ५ सामने खेळले, ज्यात त्यांना संयुक्त यजमान नेदरलँड्सविरुद्ध केवळ २-० ने पराभव पत्करावा लागला. याशिवाय, तीन सामने अनिर्णित राहिले, तर त्यांना एक सामना जिंकण्यात यश आले. यापूर्वी १९७४ मध्ये अजिंदर कौर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या विश्वचषकात भारतीय महिला संघाने चौथे स्थान पटकावले होते. तेव्हापासून ५२ वर्षांच्या काळात हॉकी विश्वचषकातील ही भारतीय महिला संघाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

India U-19 Team: बाप सुपरस्टार,आता मुलांचा नंबर! द्रविड-सेहवागच्या लेकांची टीम इंडियात एन्ट्री; ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार

Web Title: Hockey world cup 2026 indian womens team beat germany 3 1 navneet kaur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Hockey Team India
  • Hockey World Cup 2026
  • Indian womens team

संबंधित बातम्या

Hockey World Cup 2026: भारताचे वर्ल्ड कप स्वप्न भंगले! अर्जेंटिनाकडून दारुण पराभव; टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर
1

Hockey World Cup 2026: भारताचे वर्ल्ड कप स्वप्न भंगले! अर्जेंटिनाकडून दारुण पराभव; टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

Hockey World Cup 2026: ‘करो या मरो’च्या लढतीत India फेल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-0 ड्रॉ, वर्ल्ड कपमधून बाहेर
2

Hockey World Cup 2026: ‘करो या मरो’च्या लढतीत India फेल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-0 ड्रॉ, वर्ल्ड कपमधून बाहेर

Hockey World Cup 2026: नेदरलँड्सकडून पराभव, सेमीफायनलचं गणित बिघडलं! अर्जेंटिनाविरुद्ध भारताला करावा लागणार मोठा चमत्कार
3

Hockey World Cup 2026: नेदरलँड्सकडून पराभव, सेमीफायनलचं गणित बिघडलं! अर्जेंटिनाविरुद्ध भारताला करावा लागणार मोठा चमत्कार

Hockey World Cup 2026: भारत-नेदरलँड्समध्ये ‘हायव्होल्टेज’ महामुकाबला! सामना कधी, कुठे अन् किती वाजता? जाणून घ्या
4

Hockey World Cup 2026: भारत-नेदरलँड्समध्ये ‘हायव्होल्टेज’ महामुकाबला! सामना कधी, कुठे अन् किती वाजता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.