ACC Women's Asia Cup 2026
आशिया कप स्पर्धेत भारत हा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे, पण यावेळी त्यांच्यासमोर आपल्या मागील पराभवाचा बदला घेण्याचे आव्हानही असेल. २०२४ मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या मागील स्पर्धेत श्रीलंकेने भारताला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. आता, हरमनप्रीतचा संघ पुन्हा एकदा आशियाई विजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल.
आशिया कप २०२६ स्पर्धेत एकूण आठ संघ आहेत. त्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. भारताला पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँगसोबत ‘अ’ गटात स्थान देण्यात आले आहे. तर, गतविजेत्या श्रीलंकेला बांग्लादेश, इंडोनेशिया आणि यजमान युएईसोबत ‘ब’ गटात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ ३० ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दुसरा सामना ३ सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध होईल. त्यानंतर गट फेरीतील सर्वात बहुप्रतिक्षित सामना ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाईल . आयसीसी महिला टी२० चषक २०२६ नंतर या दोन संघांमधील ही पहिलीच भेट असेल.
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने १० आणि ११ सप्टेंबर रोजी, तर अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. महिला टी२० आशिया कप प्रथमच दुबईमध्ये आयोजित केला जात असून, सर्व १५ सामने याच शहरात खेळले जातील. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच स्पर्धांमध्ये भारताने तीन टी२० आशिया कप विजेतेपदे पटकावली आहेत.
एसीसी महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकुर, नंदिनी शर्मा, क्रांति गौड, प्रतिका रावल.






