Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hong Kong Sixes 2026: क्रुणाल पांड्या बनला टीम इंडियाचा कॅप्टन; भुवनेश्वरच्या जागी ‘या’ खेळाडूची एन्ट्री

Krunal Pandya captain replacing Bhuvneshwar Kumar Hong Kong Sixes 2026: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर भुवनेश्वर कुमार हाँगकाँग सिक्सेस २०२६ च्या संघातून बाहेर पडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 17, 2026 | 05:29 PM
Krunal Pandya captain Hong Kong Sixes 2026

Krunal Pandya captain Hong Kong Sixes 2026

Follow Us
Follow Us:
  • भुवनेश्वर कुमार बाहेर
  • क्रुणाल पांड्याकडे टीम इंडियाची कमान
  • भुवनेश्वर कुमारच्या जागी कोणाला संधी?
हाँगकाँग सिक्सेस २०२६ स्पर्धेपूर्वी भारतीय संघात एक मोठा बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु, भुवनेश्वर भारतीय टी२० संघात सामील झाला असून तो न्यूझीलंड दौऱ्यात व्यस्त असेल. यामुळे, तो हाँगकाँग सिक्सेसमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी कृणाल पांड्याची नियुक्ती करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर भुवनेश्वरच्या बदली खेळाडूचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्समध्ये मोठा भूकंप! आयपीएलचे विजेतेपदं जिंकून देणाऱ्या ‘या’ दिग्गजाने सोडली साथ

कृणाल पांड्या भारतीय संघाचा कर्णधार

हाँगकाँग सिक्सेस २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा भुवनेश्वर कुमारकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. परंतु यानंतर, बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये भुवनेश्वर कुमारचाही समावेश होता. भारत-न्यूझीलंड मालिका २२ ऑक्टोबरला सुरू होत आहे, तर सिक्सेस ३० ऑक्टोबरला सुरू होत आहेत. भारतीय वरिष्ठ संघात निवड झाल्यानंतर भुवनेश्वरला सिक्सेसमधून वगळणे निश्चित होते.

हाँगकाँग क्रिकेटने आता अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कृणाल पांड्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल. एका निवेदनात कृणाल म्हणाला की, ‘हाँगकाँग नमस्कार. मी कृणाल पांड्या, भारतीय संघाचा कर्णधार आहे. तीन दिवसीय स्पर्धेत बारा संघ एका ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील. आम्ही ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आलो आहोत. सामने प्रत्येकी सहा षटकांचे असतील. या आणि आम्हाला खेळताना पहा.’

Captaincy duties? Checked. Excitement levels? Through the roof! 🔥🇮🇳 Krunal Pandya is all set for Hong Kong Sixes 2026! 🤌#TurnItUpToSix #HongKongSixes #M品牌活動#大型體育活動事務委員會#政府資助計劃 #MMarkEvents #MajorSportsEventsCommittee pic.twitter.com/Asdza8cra9 — Cricket Hong Kong, China (@CricketHK) October 17, 2026

भुवनेश्वर कुमारच्या जागी कोणाला स्थान देण्यात आले?

भुवनेश्वर कुमारला संघातून वगळल्यानंतर, हाँगकाँग क्रिकेटने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज कुलवंत खेजरोलिया टीम इंडियामध्ये भुवनेश्वर कुमारची जागा घेईल. कुलवंतने आतापर्यंत नऊ आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला असून सहा विकेट्स घेतले आहेत. तो आरसीबी, केकेआर आणि जीटी यांसारख्या यशस्वी संघांचा भाग राहिला आहे. मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आपल्या टी-२० कारकिर्दीत २७ सामने खेळले असून २७ विकेट्स घेतले आहेत. आता तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये हाँगकाँग सिक्सेस २०२६ स्पर्धेत आपली खेळताना दिसेल.

हाँगकाँगच्या सिक्सेससाठी टीम इंडियाचा अपडेटेड संघ: कृणाल पांड्या (क), नितीश राणा, शशांक सिंग, टी नटराजन, कुलवंत खेजरोलिया, राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया.

क्रिकेट, ग्लॅमर अन्…! नव्या इनिंगसाठी SRH ची मालकीण सज्ज; Kavya Maran ‘या’ म्युझिशियनसोबत बांधणार लग्नगाठ?

Web Title: Hong kong sixes 2026 krunal pandya captain bhuvneshwar kumar out pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • Hong Kong Sixes
  • krunal pandya

संबंधित बातम्या

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11
1

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11

IND vs WI : शेवटच्या लढतीआधी टीम इंडियात मोठा बदल; अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर, भुवनेश्वर कुमारचं कमबॅक
2

IND vs WI : शेवटच्या लढतीआधी टीम इंडियात मोठा बदल; अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर, भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.