फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रणजी ट्रॉफी : आता लवकरच इंडियन प्रीमियर २०२५ चे मेगा ऑक्शन होणार आहे, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूवर मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी केली जाते. त्याचबरोबर भारतीय संघामध्ये असणारे खेळाडू सुद्धा प्रत्येक सामन्याचे त्याचबरोबर त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा त्यांना त्याच्या पगाराहून अधिक पगार एवढं मात्र खरं. आता बऱ्याच जणांना भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळत नाही त्यामुळे ते आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून मोठ्या प्रमाणात कमाई करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांना आयपीएलमध्ये चांगली किंमत मिळत किंवा त्यांना संघामध्ये घेतले जात नाही ते खेळाडू काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का? आयपीएलमध्ये ज्या क्रिकेट खेळाडूंना स्थान मिळत नाही ते खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असतात. या खेळाडूंना पगार किती मिळतो यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.
रणजी ट्रॉफी पहिल्यांदा १९३४-३५ मध्ये खेळला गेला. या स्पर्धेतून खेळणाऱ्या खेळाडू किती मानधन मिळते हे तुम्हाला माहिती आहे का? मात्र, आज आम्ही तुम्हाला रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारे क्रिकेटपटू किती कमावतात? या क्रिकेटपटूंना एका सामन्यात किती पैसे मिळतात? बऱ्याचदा असे कानावर येते की रणजी ट्रॉफीमध्ये कमी पगार असल्यामुळे मोठे खेळाडू हे रणजी ट्रॉफीमध्ये खेळत नाहीत. आयपीएलमध्ये खेळाडूंना करोडो रुपये मिळतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रणजी ट्रॉफीमधील पगाराची रचना आयपीएलपेक्षा खूपच वेगळी आहे. रणजी ट्रॉफीमध्ये खेळाडूंना प्रतिदिन मानधन मिळते.
रणजी ट्रॉफीच्या पगाराबद्दल बोलायचं झालं तर उदाहरणार्थ, ४० पेक्षा जास्त सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंना प्रतिदिन ६० हजार रुपये इतकी रक्कम मिळत. २० ते ४० सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रतिदिन ५० हजार रुपये, तर २० पेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंना प्रतिदिन ४० हजार रुपये मानधन मिळते. यांच्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे की, कधी कधी खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळत नाही म्हणजेच प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळत नाही अशावेळी खेळणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत खूपच कमी आहे. खेळणाऱ्या खेळाडूंच्या तुलनेत बेंचवर बसलेल्या खेळाडूंना अर्धा पगार दिला जातो.