फोटो सौजन्य - बीसीसीआय
India vs West Indies match report : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये मालिकेचा पहिला सामना पार पडला. हा पहिला सामना तिसऱ्याच दिवशी संपला आहे. भारताचे संघाने पहिल्याच इनिंग मध्ये वेस्ट इंडिज समोर 448 धावा करून डाव घोषित केला होता. वेस्टइंडीजच्या संघाने पहिल्या डावामध्ये 162 धावा केल्या होता. टीम इंडियाने वेस्टइंडीजच्या संघाला पहिल्याच दिवशी दुसऱ्या सेशनमध्ये 162 धावांवर रोखले. तिसऱ्या दिवशी वेस्टइंडीजच्या संघाला भारतीय संघाने 146 धावांवर रोखले आणि सामना नावावर केला आहे.
भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला 140 धावांनी पराभूत केले. भारताच्या गोलंदाजांची विशेष कामगिरी राहिली टीम इंडियाचा तिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांनी संघाला चार विकेट्स मिळवून दिले तर मोहम्मद सिराजने देखील आणखी एकदा संघाला तीन विकेट्स घेऊन सामना जिंकवण्यात मोलाचे योगदान दिले. पहिल्या इनिंग मध्ये मोहम्मद सिराजने चार विकेट्स नावावर केले तर दुसऱ्यां इनिंगमध्ये तीन विकेट्स घेतले आहेत. कुलदीप यादवने वेस्ट इंडिजचा शेवटचा बळी घेत भारताचा विजय निश्चित केला.
𝐀 𝐩𝐞𝐫𝐟𝐞𝐜𝐭 𝐬𝐭𝐚𝐫𝐭 𝐭𝐨 𝐈𝐧𝐝𝐢𝐚’𝐬 𝐡𝐨𝐦𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐬𝐞𝐚𝐬𝐨𝐧! 🤍🇮🇳 A convincing victory for Team India as they register a thumping win against West Indies in the first Test. 💪🏼#INDvWI #TestCricket #Ahmedabad #Sportskeeda pic.twitter.com/wBYJhaya1B — Sportskeeda (@Sportskeeda) October 4, 2025
रवींद्र जडेजाने पाच विकेट्चे लक्ष्य चुकवले, परंतु त्याची अष्टपैलू कामगिरी प्रभावी होती. कुलदीप यादवने दोन बळी घेतले, तर सिराजने तीन बळी घेतले. भारताने वेस्ट इंडिजला १४६ धावांवर गुंडाळले आणि सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकला. मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा व्यतिरिक्त कुलदीप यादवने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले तर वॉशिंग्टन सुंदर याने संघाला एक विकेट मिळवून दिला. भारताची फलंदाजी देखील चांगली राहिली, दुसरा सामना हा 10 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा विजयाचा टक्का ४६.६७ होता, जो आता ५५.५६ पर्यंत वाढला आहे. दरम्यान, वेस्ट इंडिज अजूनही या मालिकेतील पहिल्या विजयासाठी उत्सुक आहे. त्यांनी आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि ते सर्व गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या खात्यात १०० टक्के गुण आहेत, तर श्रीलंकेच्या खात्यात ६६.६७ टक्के गुण आहेत.