Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही…’, IPL 2026 पूर्वी टीकाकारांना शुभमन गिलचे सडेतोड प्रत्युत्तर

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात नव्हता. आयपीएल 2026 सुरू होण्याआधी शुभमन गिलची पत्रकार परिषद पार पडली, आता त्याने सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 27, 2026 | 09:01 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Shubman Gill’s reply to critics : आयपीएल २०२६ २८ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू सहसा भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचतात. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात नव्हता. आता आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याला भारताच्या टी-२० संघात आपले स्थान पुन्हा मिळवण्याची संधी आहे. अनेकांना वाटते की गिलला अजूनही टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. शुभमन गिलने आता त्या सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

पाकिस्तान पुन्हा एकदा इज्जत घालवली! PSL सामन्यादरम्यान चेंडूचा रंग अचानक बदलला? पाक पुन्हा एकदा ठरला उपहासाचा धनी

मला काहीही सिद्ध करायचं नाहीये…

आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत शुभमन गिलला विचारण्यात आले की, टी-२० संघातून वगळल्यानंतर, भारतीय संघात पुन्हा दिसण्यासाठी त्याला आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल का. गिलने स्पष्ट केले की, तो आयपीएलमध्ये सातत्याने धावा करत आहे आणि त्याला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तो म्हणाला, “तुम्ही गेल्या ३-४ हंगामांकडे पाहिल्यास, आयपीएलमध्ये माझ्या सर्वाधिक धावा आहेत. त्यामुळे मला स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. आम्ही गेल्या ४ वर्षांपासून या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे.”

शुभमन गिल पत्रकार परिषदेमध्ये पुढे म्हणाला, “एक फलंदाज म्हणून मी या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मला कोणालाही माझी योग्यता सिद्ध करण्याची गरज नाही. एक संघ म्हणून आम्हाला सातत्याने चांगला क्रिकेट खेळण्याची गरज आहे. जर आम्ही असेच करत राहिलो, तर आम्ही पुन्हा ट्रॉफी जिंकू.”

🚨BIG STATEMENT BY SHUBHMAN GILL ON T20I SELECTION 🚨 Shubhman Gill said : “I don’t need proves my cricketing skills to anyone. I have most run scorer in the IPL over the 3-4 seasons. Our focus to lift the trophy for Gujarat Titans in IPL 2026.” 🤯pic.twitter.com/7x2pQa71EQ — Cricket Central (@CricketCentrl) March 26, 2026

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, त्याला त्याच्या वैयक्तिक कामगिरीची चिंता नाही. त्याला फक्त आपल्या संघाला आयपीएल चॅम्पियन बनवायचे आहे. गिल म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी वैयक्तिक विक्रमांवर लक्ष केंद्रित करत नाही. माझ्या देशाला आणि गुजरात संघाला जिंकवून देणे हे माझे ध्येय आहे. हे ध्येय माझ्यासाठी बदलणार नाही. तुम्ही आयपीएल खेळत आहात आणि तुम्ही जिंकण्यासाठीच खेळता. तेच माझे ध्येय आहे. सध्या माझे वैयक्तिक ध्येय आयपीएल ट्रॉफी जिंकणे हे आहे.”

Web Title: I dont need to prove anything shubman gill blunt reply to critics ahead of ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • cricket
  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Shubman Gill
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?
1

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले
2

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.