Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात खळबळ! एकदिवसीय सामने 40 ओव्हर्सचे होणार? ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आयसीसीच्या या वार्षिक सभेत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकदिवसीय सामने हे 50 ऐवजी 40 ओव्हर्सचे खेळवण्यावर चर्चा करण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 13, 2026 | 02:37 PM
क्रिकेटविश्वात खळबळ! एकदिवसीय सामने 40 ओव्हर्सचे होणार? ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:

नुकतीच पार पडली आयसीसीची वार्षिक बैठक 
मॉरीशस देशाला मिळाली असोसिएट मेंबरशिप 
वनडे सामने 40-40 ओव्हर्स करण्यावर झाली चर्चा

ICC Annual Meeting: नुकतीच स्कॉटलँड येथे आयसीसी (इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) ची वार्षिक सभा पार पडली. 8 जुलै ते 11 जुलै दरम्यान ही सभा पार पडली. या बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित केले गेले आणि त्यावर चर्चा देखील करण्यात आली. या बैठकीत चार प्रमुख गोष्टींवर चर्चा आणि काही (Cricket) महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आयसीसीच्या या वार्षिक सभेत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकदिवसीय सामने हे 50 ऐवजी 40 ओव्हर्सचे खेळवण्यावर चर्चा करण्यात आली. यावर बैठकीत विस्तृत चर्चा देखील करण्यात आली. मात्र बैठकीत कोणत्याच सदस्यांचे या मुद्द्यावर एकमत झाले नसल्याचे समोर आले. त्यामुळे सध्या तरी एकदिवसीय सामने आहे त्याच पद्धतीने सुरू राहणार असल्याचे समजते आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण 9 संघ सहभागी होतात. मात्र या आयसीसीच्या बैठकीत 9 ही संख्या वाढवून 12 करण्यावर चर्चा झाली. यामध्ये अफगाणिस्तान, आयर्लंड आणि झिम्बाब्वेचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र यामध्ये सकारात्मक तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे सध्या डब्ल्यूटीसीमध्ये 9 संघ सहभागी असणार आहेत.

ICC Hall of Fame: भारतासाठी अभिमानाचा क्षण! सौरव गांगुली-अंजुम चोप्रा यांना क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान

या बैठकीत अमेरिका क्रिकेट आणि कॅनडा क्रिकेट यांच्यावरील निलंबन मागे घ्यायचे का अशी चर्चा देखील करण्यात आली. मात्र आयसीसीने त्यांच्यावरील निलंबन कायम ठेवले आहे. अंतर्गत प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय वाद न सुटल्यामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.मॉरिशस देशाला देखील आयसीसीने असोसिएट मेंबरशिप म्हणजेच सहयोगी सदस्यत्व बहाल केले आहे. मॉरिशसच्या समावेशानंतर आता आयसीसीच्या एकूण सदस्य देशांची संख्या १११ वर पोहोचली आहे, ज्यामध्ये १२ पूर्ण वेळ सदस्य आणि ९९ सहयोगी सदस्य आहेत.

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र

कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी

आपल्या पत्रात, CTI ने ४ जुलै २०२६ रोजी इंग्लंडमधील मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा संदर्भ दिला आहे. संस्थेनुसार, सामन्याच्या षटकांच्या मधल्या वेळेत, जेव्हा लाखो लोक आपल्या कुटुंबासोबत थेट सामना पाहत होते, तेव्हा ड्यूरेक्स कंडोमची एक जाहिरात प्रसारित करण्यात आली होती.

Web Title: Icc annual meeting in scotland odi matches 40 overs wtc usa suspension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • cricket news
  • ICC
  • Jay shah
  • WTC

संबंधित बातम्या

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
1

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
2

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
3

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
4

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.