ICC AWARDS 2024 : स्मृती मंधानाला मिळाला ICC Women's ODI Cricketer of Year 2024 चा अॅवॉर्ड, दुसऱ्यांदा मिळवला सन्मान
ICC AWARDS 2024 : ICC ने ICC Women’s ODI Cricketer of Year 2024 चा किताब पुन्हा एकदा स्मृती मंधानाच्या गळ्यात घातला आहे. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहला २०२४ चा ICC कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. स्मती मंधानाने आपल्या एकदिवसीय सामन्यात दर्जेदार कामगिरी करीत क्रिकेटर ऑफ द इअरचा किताब पटकावला. ICC ने सोमवारी २०२४ च्या पुरस्कारांची नवीन यादी जाहीर केली. या यादीत भारतातील दोन स्टार खेळाडूंचा समावेश आहे.
स्मृती मंधानाला मिळाला मोठा किताब
For the second time, one of the leading stars of the game takes out the ICC Women’s ODI Cricketer of the Year award 🌟 pic.twitter.com/LJbgA8OobX
— ICC (@ICC) January 27, 2025
स्मृती मंधानाची वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू
बुमराहला सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे, तर स्मृती मंधानाला वर्षातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार देण्यात आला आहे. २०१८ नंतर हा पुरस्कार जिंकणारा बुमराह हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. २०१८ मध्ये, विराट कोहलीची वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवड झाली.
ICC ने २०२४ मध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली. काही दिवसांपूर्वी, ICC ने या पुरस्कारांसाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये चार खेळाडूंची नावे सुचवली होती. यानंतर मतदानाच्या आधारे विजेत्याची निवड करण्यात आली. ICC च्या वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूसाठी जसप्रीत बुमराह सर्वांची पसंती होता. बुमराहने इंग्लंडचा जो रूट, हॅरी ब्रूक आणि श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस यांना हरवून हा पुरस्कार जिंकला.
बुमराहच्या १३ सामन्यांत ७१ विकेट्स
जसप्रीत बुमराहने २०२४ मध्ये अद्भुत कामगिरी केली आहे. त्याने या वर्षी १३ कसोटी सामन्यांमध्ये १४.९२ च्या सरासरीने ७१ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकता आली नसली तरी बुमराह येथेही प्रसिद्धीच्या झोतात राहिला. मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. जो रूटने २०२४ मध्ये १७ कसोटी सामन्यात १५५६ धावा केल्या आणि हॅरी ब्रूकने १२ कसोटी सामन्यात ११०० धावा केल्या. श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसने ९ कसोटी सामन्यात १०४९ धावा केल्या.
मंधानाने सदरलँड आणि अटापट्टूला मागे टाकले
स्मृती मानधनाने २०२४ चा आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार जिंकण्यासाठी लॉरा वोल्वार्ड, चामारी अटापट्टू आणि अॅनाबेल सदरलँडला मागे टाकले. मानधनाने या वर्षी १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतकांसह ७४७ धावा केल्या. इतर खेळाडू तिच्या कामगिरीच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत.