Jasprit Bumrah Injury Update : जसप्रीत बुमराहला अचानक सोडावे लागले मैदान; काय होते कारण; प्रसिद्ध कृष्णाने दिली मोठी अपडेट
ICC Cricketer of the Year : भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीबद्दल ICC ने मोठे बक्षीस दिले आहे. बुमराहला ICC ने वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून घोषित केले आहे. टीम इंडियाच्या या खेळाडूने गेल्या वर्षी कसोटीत आपल्या शानदार खेळाने खळबळ उडवून दिली.
जसप्रीत बुमराहला क्रिकेटचा सर्वोच्च सन्मान
🚨 HISTORY CREATED BY BOOM. 🚨
– Jasprit Bumrah becomes the first Indian pacer in history to win the ICC Test Cricketer Of The Year award. 🤯🇮🇳 pic.twitter.com/99pWh5L8gf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 27, 2025
क्रिकेट संघाचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ‘ICC क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारात खळबळ उडवून दिली आहे. घरच्या आणि परदेशी भूमीवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी बुमराहला वर्षाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये ७१ विकेट्स घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी, त्याला ICC ने वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. बुमराह हा ICC चा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
पाठीच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर टीम इंडियासाठी पुनरागमन
जसप्रीत बुमराहने २०२३ च्या अखेरीस पाठीच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर टीम इंडियासाठी पुनरागमन केले. पुनरागमनानंतर बुमराहने आपल्या शानदार खेळाने खळबळ उडवून दिली. दुखापतीतून परतल्यानंतर बुमराह २०२४ मध्ये रेड बॉल क्रिकेटमध्ये कहर करेल, असे वाटले होते. बुमराहने २०२४ मध्ये १४.९२ च्या उत्कृष्ट सरासरीने विकेट्स घेतल्या आणि या काळात त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.
जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक
ICC ने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, बुमराह २०२४ मध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाज होता ज्याने देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशा जिवंत ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.’ उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज बुमराहने इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर भारताच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये परदेशातही चांगली कामगिरी केली.
या पुरस्काराच्या शर्यतीत बुमराहने इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि जो रूट आणि ICC चा वर्षातील उदयोन्मुख क्रिकेटपटू कामिंदू मेंडिस यांना मागे टाकले. २०१८ मध्ये विराट कोहलीनंतर हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. कोहलीच्या आधी, अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला २०१६ मध्ये वर्षाचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू आणि वर्षाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले होते.
हा सन्मान मिळाल्याने जसप्रीत बुमराह आनंदी
ICC चा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू झाल्यानंतर जसप्रीत बुमराहदेखील खूप आनंदी आहे. तो म्हणाला, ‘वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाल्याने मला खूप सन्मानित वाटत आहे. कसोटी क्रिकेट हा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळचा फॉरमॅट राहिला आहे आणि या व्यासपीठावर मला मान्यता मिळणे खरोखरच खास वाटते.
“हा पुरस्कार केवळ माझ्या वैयक्तिक प्रयत्नांचेच नाही तर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि दररोज मला प्रेरणा देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांच्या, प्रशिक्षकांच्या आणि चाहत्यांच्या अढळ पाठिंब्याचेही प्रतिबिंब आहे,” असेही त्यांनी सांगितले. त्याच वेळी, भारताचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि माझ्या प्रयत्नांमुळे जगभरातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येते हे जाणून हा प्रवास आणखी खास बनतो.