IND Vs BAN Champions Trophy 2025: बांग्लादेशची खेळी समाप्त; भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य
India Vs Bangladesh: कालपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांग्लादेशने भारताला 50 ओव्हर्समध्ये 229 धावांचे लक्ष्य दिले आहे. बांग्लादेशची डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मात्र तौहिद हृदयने शतकी खेळी करत बांग्लादेशचा डाव सावरला. तसेच भारतासमोर एक सन्मानजनक धावसंख्या उभी करण्यासाठी प्रयत्न केले. बांग्लादेशच्या तौहीद हृदोयने आपले पहिले शतक साजरे केले आहे. भारताविरुद्ध त्याने शतक ठोकले आहे. 114 चेंडूत 100 धावा त्याने केल्या आहेत.
CT 2025. WICKET! 49.4: Towhid Hridoy 100(118) ct Mohammad Shami b Harshit Rana, Bangladesh 228 all out https://t.co/ggnxmdGyLi #BANvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 20, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रचला मोहम्मद शामीने इतिहास
दुखापतीतून सावरल्यानंतर १४ महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० बळी पूर्ण करून इतिहास रचला. गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी दुबई क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सामन्यात त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. शमीने सामन्यातील तिसरा बळी घेत हा टप्पा गाठला. त्याने जाकर अलीला ६८ धावांवर बाद करून ही कामगिरी केली. यापूर्वी, त्याने बांगलादेशचा सलामीवीर सौम्य सरकार (५ चेंडूत ०) आणि मेहदी हसन मिराज (१० चेंडूत ५) यांना बाद केले. उल्लेखनीय म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कनंतर हा विक्रम करणारा तो जगातील दुसरा सर्वात जलद गोलंदाज ठरला. स्टार्कने १०२ सामने खेळले.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, शमीने अजित आगरकरचा मागील विक्रम मोडला, ज्याने १३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० बळी घेतले होते. जगातील गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, सर्वात कमी सामन्यांमध्ये हा आकडा गाठण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने १०२ सामन्यांमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या. पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकने १०४ सामन्यांमध्ये हा आकडा गाठला.
रोहित शर्माच्या चुकीने हुकली अक्षर पटेलची हॅट्ट्रीक
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली ज्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलसह भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन तुटले. दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात, फिरकी गोलंदाज अक्षर पटेल त्याची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ होता पण कर्णधार रोहितने एक अतिशय सोपा झेल सोडला आणि अक्षर पटेलला इतिहास रचण्यापासून रोखले.