रोहित शर्माच्या चुकीने हुकली अक्षर पटेलची हॅट्ट्रीक; हिटमॅननेसुद्धा मैदानावरच हात आपटत व्यक्त केले दुःख; पाहा VIDEO
Champions Trophy 2025 : २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्यात, भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक चूक केली ज्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलसह भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन तुटले. दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात, फिरकी गोलंदाज अक्षर पटेल त्याची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ होता पण कर्णधार रोहितने एक अतिशय सोपा झेल सोडला आणि अक्षर पटेलला इतिहास रचण्यापासून रोखले.
रोहित शर्माच्या एका चुकीने अक्षर पटेलची हॅट्ट्रीक हुकली
WHAT HAVE YOU DONE ROHIT 😯
Axar Patel misses out on a hatrrick vs Bangladesh as Rohit Sharma dropped a sitter in the slip region. pic.twitter.com/6h7txDasEN
— Sports Production (@SSpotlight71) February 20, 2025
बांगलादेशची अवस्था नाजूक
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे. मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांनी सुरुवातीला तीन विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर, अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच षटकात कहर केला आणि बांगलादेशला अडचणीत आणले.
9 व्या षटकात अक्षर पटेल आला गोलंदाजीला
सलग ८ षटकांच्या वेगवान गोलंदाजीनंतर, कर्णधार रोहित शर्माने ९ व्या षटकात अक्षर पटेलला गोलंदाजी करायला सांगितले. अक्षरने दुसऱ्या चेंडूवर तन्जीद हसनची विकेटही घेतली. विकेटकीपर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर नवीन फलंदाज मुशफिकुर रहीमही राहुलच्या हाती झेलबाद झाला. सलग २ चेंडूत २ बळी घेतल्यानंतर अक्षरला हॅटट्रिकची संधी होती.