
ICC Ranking : अर्शदीपला मिळाले न्यूझीलंडविरुद्धच्या दमदार खेळीचे बक्षिस
या आठवड्यात गोलंदाजी क्रमवारीत सर्वात जास्त सुधारणा करणाऱ्या खेळाडूमध्ये फक्त अर्शदीपचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान 50 षटकांच्या फॉरमेटमध्ये जगातील क्रमांक एकचा गोलंदाज म्हणून कायम आहे.
तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीही 15 क्रमांक पुढे सरकत संयुक्त रुपात 12 व्या स्थानी पोहचला आहे, तर त्याचा सहकारी खेळाडू काइल जॅमीसन 15 क्रमांक पुढे सरकत 45 व्या स्थानी पोहचला आहे.
इंग्लंडचा फलंदाज टॉम बँटनला ही ताज्या क्रमवारीत फायदा मिळाला आहे. त्याने एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून देणारे शतक ठोकले होते. बँटनने 99 चेंडूंत 121 धावा केल्या, जे त्याचे दुसरे ODI शतक ठरले.
त्याच्या या खेळीच्या मदतीने इंग्लंडने मालिकेत बरोबरी केली व फलंदाजी क्रमवारीत 34 क्रमांक पुढे सरकत आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट 13 व्या क्रमांकावर पोहचला.
बँटनचा सहकारी खेळाडू जो रूटचेही टॉप-10 मध्ये पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर रुट दोन स्थान पुढे सरकत नवव्या स्थानी पोहचला आहे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल ODI मध्ये जगातील क्रमांक एकचा फलंदाज म्हणून कायम आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही वनडे गोलंदाजीच्या टॉप-10 यादीत पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात प्रत्येकी एक विकेट घेतल्यानंतर तो चार स्थान पुढे सरकत सातव्या स्थानी पोहचला आहे. या काळात शारजाहमध्ये झिम्बॉब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या अटीतटीच्या टेस्ट सिरीजनंतर दोन्ही संघातील खेळाडूंच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
Mumbai Indians: चाहत्यांना दणक्यावर दणके! मुंबई पलटणकडून 13 खेळाडू रिलीज; ‘या’ गोलंदाजाचा समावेश
अफगाणिस्तानविरुद्धची मालिका झिम्बॉब्वेने 2-0 अशी आपल्या खिशात घातली. अशात टेस्ट क्रमवारीत झिम्बॉब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीला याचा फायदा मिळाला आहे. त्याने दुसऱ्या व निर्णायक टेस्ट सामन्यात सहा विकेट घेतले. म्हणून त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अशाप्रकारे मुजरबानी पाच स्थान पुढे सरकत 16 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
तसेच फिरकीपटू ग्रीम क्रेमरही सहा स्थानाची झेप घेत 65 व्या क्रमांकावर पोहचला आहे. फलंदाजी क्रमवारीत झिम्बॉब्वेचा ओपनर इनोसेंट काइया 20 क्रमांकांच्या झेपेसह 50 व्या स्थानी पोहचला आहे, तर अनुभवी ब्रँडन टेलर 40 स्थानाच्या पुढे जात 62 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
अफगाणिस्तानचा अष्टपैलू नसीर मारूफखिलने आपल्या टेस्ट डेब्यूत शानदार कामगिरी केली. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात शतक ठोकले व सात विकेटही घेतले. पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये अशी किमया करणारा तो चौथा खेळाडू ठरला. त्यासोबतच तो कसोटी फलंदाजी क्रमवारीत 100 च्या आत म्हणजेच 93 व्या स्थानी पोहचला असून गोलंदाजीत संयुक्त रुपात 78 व्या स्थानी विराजमान आहे.
Ans: भारताचा कर्णधार शुभमन गिल वनडे फलंदाजी क्रमवारीत जगातील अव्वल फलंदाज म्हणून कायम आहे.
Ans: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर जो रुट दोन स्थानांनी पुढे जात नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Ans: अफगाणिस्तानचा अष्टपैलू नसीर मारूफखिल याने कसोटी पदार्पणात शतक झळकावण्यासोबतच सात विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.