भारत-पॅलेस्टाईन सामना (फोटो- ट्विटर)
काल क्वालालंपूर फुटबॉल स्टेडियमवर भारत आणि पॅलेस्टाईन फुटबॉलचा सामना खेळवला गेला. भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात ‘AFC U17 आशियाई कप २०२७’ चा क्वालिफायर सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यादरम्यान पॅलेस्टाईनच्या एका खेळाडूने भारतीय संघाचा कर्णधार दलालमुओन गँगटे याला उद्देशून आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी हातवारे केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मैदानावर एकच तणाव निर्माण झाला होता.
IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात
Seriously?????? 😡😡😡 Palestine’s No. 19 allegedly makes a racist gesture towards India U17 captain Gangte, yet the referee chooses to look the other way. The AFC cannot let this slide. An immediate investigation and strict action are needed!!!! https://t.co/9OgGqss2qc — The Khel India (@TheKhelIndia) November 17, 2026
खेळाच्या मैदानावर असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही असा इशारा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने दिला आहे. कोणत्याही प्रकारचा वर्णद्वेष सहन केला अजनर नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. . भारतीय महासंघाने या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल आणि पुरावे सादर करत AFC कडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. संबंधित पॅलेस्टाईन खेळाडूवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
भारताच्या १७ वर्षांखालील पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार दलालमुओन गँगटे याच्याविरुद्ध घडलेल्या कथित वर्णद्वेषी प्रकारावरून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आक्रमक झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी AIFF ने आता आशियाई फुटबॉल महासंघाकडे सांनायचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.
पुणे शहरात Football चा थरार! ‘या’ चार संघांचा सेमीफायनलमध्ये प्रवेश; खडकी ब्ल्युज् संघाने थेट…
खेळाच्या मैदानावर कोणताही वर्णद्वेष किंवा चुकीची वागणूक देणे हे अत्यंत चुकीचे आहे. असा प्रकार फुटबॉलच्या मूलभूत मूल्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने व्यक्त केला आहे. फुटबॉल खेळ हा परस्पर सन्मान आणि समानतेवर आधारित आहे. त्यामुळे खेळाच्या या मूलभूत आत्म्याला ठेच पोहोचवणारे वर्तन अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धांमध्ये खेळाडूंची मानहानी करणाऱ्या अशा प्रकरणांची गंभीर दखल घेत, दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी AIFF आक्रमक पावले उचलत तक्रार दाखल केली आहे. खेळातील शिस्त कायम राखण्यासाठी तक्रार दाखल करणे योग्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Ans: पॅलेस्टाईनच्या एका खेळाडूने भारतीय कर्णधार दलालमुओन गँगटे याच्याविरोधात कथित आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी हातवारे केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ans: या गंभीर प्रकरणाची दखल घेत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (AIFF) आशियाई फुटबॉल महासंघाकडे (AFC) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.






