Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Ranking : कसोटीत स्टार्क पुन्हा अव्वल स्थानी, टी-20 मध्ये अय्यर 7 व्या स्थानी विराजमान

ICC Ranking च्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने कसोटी गोलंदाजीमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने टी-२० क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेत सातवे स्थान मिळवले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 04, 2026 | 05:08 PM
ICC Ranking : कसोटीत स्टार्क पुन्हा अव्वल स्थानी, टी-20 मध्ये अय्यर 7 व्या स्थानी विराजमान

ICC Ranking : कसोटीत स्टार्क पुन्हा अव्वल स्थानी, टी-20 मध्ये अय्यर 7 व्या स्थानी विराजमान

Follow Us
Follow Us:
  • ऑगस्टमध्येच स्टार्कने मिळवलेले अग्रस्थान
  • एडेन मार्करामची आगेकूच
  • श्रेयस अय्यरच्या क्रमवारीत सुधारणा
 

साउथ आफ्रिकेविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आयसीसी कसोटी (ICC Ranking) बॉलिंग क्रमवारीत पुन्हा एकदा पहिले स्थान प्राप्त केले आहे. बुधवारी जारी झालेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर दोन क्रमांक पुढे सरकत सातव्या स्थानी पोहचला आहे.

केप टाऊनमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात 9 विकेट घेतल्यानंतर स्टार्क एक क्रमांक पुढे सरकत साऊथ आफ्रिकेच्या मॉर्को जॉन्सनच्या पुढे निघून गेला. ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने 881च्या आपल्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट रेटिंग प्राप्त केली व अव्वल स्थान काबिज केले.

ऑगस्टमध्येच स्टार्कने मिळवलेले अग्रस्थान

त्याआधी ऑगस्टमध्ये भारताच्या जसप्रीत बुमराहला पिछाडीवर टाकत स्टार्क पहिल्यांदा अव्वल स्थानी पोहचला होता. दरम्यान, गेबेरहामध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत सहा विकेट घेतल्यानंतर जॉन्सन अव्वल स्थानी पोहचला होता. केप टाऊन कसोटीत साऊथ आफ्रिकन खेळाडू फक्त तीन विकेटच घेऊ शकता, ज्याचा फायदा घेत स्टार्कने पुन्हा अव्वल स्थान आपल्याकडे राखले.

साऊथ आफ्रिकेच्या सायमन हार्मरलाही या नव्या ताज्या क्रमवारीचा फायदा मिळाला. न्यूलँड्समध्ये त्याने सामना जिंकून देण्यास महत्त्वाची कामगिरी बजावताना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सहा विकेट मिळवले. ज्यामुळे त्यांच्या संघाला विजय व मालिका आपल्या नावे करण्यास मदत मिळाली. या कामगिरीच्या जोरावर ऑफ स्पिनर 9 क्रमांक पुढे सरकत सातव्या स्थानी पोहचला आहे. आता तो आपला सहकारी खेळाडू कागिसो रबाडापासून एक स्थान पुढे आहे.

कसोटी गोलंदाजी क्रमवारीत टॉप स्थान गमावल्यानंतरही जॉन्सनने कसोटी अष्टपैलूंच्या यादीतील आपली स्थिती आणखीन बळकट केली. तिसऱ्या कसोटीत अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रेटिंग प्राप्त केली आहे. या यादीत वियान मुल्डर एक क्रमांक पुढे सरकत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे, तर हार्मर तीन क्रमांक पुढे सरकत पाचव्या स्थानी पोहचला.

PV Sindhu : पीव्ही सिंधूचा मोठा खुलासा! ‘आता मी तरुण राहिले नाही’; वर्ल्ड टूर फायनलसाठी घेतला ब्रेक

एडेन मार्करामची आगेकूच

कसोटी फलंदाजी क्रमवारीत एडेन मार्कराम एक स्थान पुढे सरकत 11 व्या स्थानी, तर मुल्डर सात स्थान पुढे 17 व्या क्रमांकावर पोहचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये रयान रिकेल्टनने सर्वात मोठी झेप घेतली आहे. तो 25 क्रमांक पुढे सरकत 23 व्या स्थानी पोहचला आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट क्रमवारी आहे.

ऑस्ट्रेलियाचा कॅमरन ग्रीन आणि एलेक्स कॅरीने देखील आपल्या स्थितीत सुधारणा केली आहे. ते अनुक्रमे तीन व दोन स्थान पुढे सरकत संयुक्त रुपात 19 व्या स्थानी पोहचलेत. मीरपुरमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशविरुद्ध आपल्या टीमच्या आठ विकेटच्या विजयानंतर वेस्ट इंडिजचा फलंदाज जस्टीन ग्रीव्स 12 क्रमांक पुढे सरकत संयुक्त रुपात 38 व्या स्थानी पोहचला आहे.

वेस्ट इंडिजचा गोलंदाज जोमेल वारिकन आणि रोस्टन चेसने देखील आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. वारिकन कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 30 व्या स्थानी पोहचला आहे, तर रोस्टन चेस अष्टपैलूंच्या यादीत संयुक्त रुपात 23 व्या स्थानी पोहचला आहे.

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

श्रेयस अय्यरच्या क्रमवारीत सुधारणा

या काळात पाकिस्तानमध्ये खेळवल्या गेलेल्या ट्राय सीरिजच्या समापनानंतर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि हारिस राऊफने वनडे गोलंदाजी क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे. आफ्रिदी एख स्थान पुढे सरकत पाचव्या, तर राऊफ पाच स्थान पुढे 24 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
त्यांचा सलामीवीर फखर जंमा वनडे फलंदाजी क्रमवारीत 9 स्थान पुढे सरकत 37 व्या स्थानी पोहचला. इंग्लंडचा बेन डकेट एक स्थानच्या सुधारणेसह सहाव्या स्थानी पोहचला आहे, तर श्रीलंकेचा पवन रत्नायकेने 20 स्थान पुढे सरकत 16 वे स्थान प्राप्त केले.
तसेच टी-20 क्रमवारीत न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या मालिका विजयानंतर श्रेयस अय्यर फलंदाजांच्या यादीत सातव्या स्थानी पोहचला. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्सदेखील 13 स्थान पुढे सरकत टी-20 फलंदाजांच्या यादीत 24 व्या क्रमांकावर आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कोण आहे?

    Ans: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने पुन्हा एकदा कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे.

  • Que: मिशेल स्टार्कने कसोटी क्रमवारीत किती रेटिंग गुण मिळवले?

    Ans: स्टार्कने कारकिर्दीतील सर्वोत्तम ८८१ रेटिंग गुण मिळवले आहेत.

  • Que: टी-२० फलंदाजी क्रमवारीत श्रेयस अय्यर कितव्या स्थानी आहे?

    Ans: श्रेयस अय्यरने दोन स्थानांची प्रगती करत सातवे स्थान मिळवले आहे.

Web Title: Icc ranking test t20 mitchell starc shreyas iyer rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • ICC Ranking
  • Marco Jansen
  • Mitchell Starc

संबंधित बातम्या

वय वर्षे 20, तिसराच वनडे अन् पाच विकेट्स! वैष्णवी शर्माची ICC Ranking मध्ये मोठी भरारी
1

वय वर्षे 20, तिसराच वनडे अन् पाच विकेट्स! वैष्णवी शर्माची ICC Ranking मध्ये मोठी भरारी

SA Vs AUS: आफ्रिकेची हवा टाईट! Mitchell Starc चा विकेट्सचा ‘सिक्सर’; सामना थरारक वळणावर
2

SA Vs AUS: आफ्रिकेची हवा टाईट! Mitchell Starc चा विकेट्सचा ‘सिक्सर’; सामना थरारक वळणावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.