Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ओल्ड इज गोल्ड’! Imran Tahir च्या फिरकीसमोर फलंदाज बेहाल; 47 व्या वर्षी Fifer घेत रचला विश्वविक्रम

Imran Tahir record five-wicket haul at 47: दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकी गोलंदाज इमरान ताहीरने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) आपल्या शानदार गोलंदाजीने इतिहास रचला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 10, 2026 | 01:53 PM
Imran Tahir record five-wicket haul at 47

Imran Tahir record five-wicket haul at 47

Follow Us
Follow Us:
  • इमरान ताहिरचा ऐतिहासिक पराक्रम
  • T20 मध्ये 5 विकेट्स घेत रचला इतिहास
  • ठरला सर्वात वयस्कर गोलंदाज
Imran Tahir record five-wicket haul at 47: दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि कॅरिबियन प्रीमियर लीग हंगामात गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या इमरान ताहीरने आपल्या गोलंदाजीने पुन्हा एकदा कहर केला आहे. सेंट लुसिया किंग्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीने ताहीरने विश्वविक्रम रचला आहे. इमरान ताहीर आता पुरुष टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात ५ विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. सेंट लुसिया किंग्सविरुद्धच्या सामन्यात इमरान ताहीरने आपल्या ४ षटकांत १७ धावा देऊन ५ विकेट्स घेतले.

Asian Games 2026: जपानमधील हॉटेल्सवरून प्रश्नचिन्ह; टीम इंडिया कुठे राहणार? BCCI ने स्पष्ट सांगितलं

इमरान ताहीरने रचला विश्वविक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून फ्रँचायझी टी२० क्रिकेट खेळत असलेला इमरान ताहीर, कॅरिबियन प्रीमियर लीगच्या २०२६ च्या हंगामात गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. सेंट लुसिया किंग्सविरुद्धच्या सामन्यात, फिरकीपटू इमरान ताहीरने उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १७ धावा देऊन पाच फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचा इकॉनॉमी रेट ४.२५ धावा होता. यासह, तो सीपीएलमध्ये कर्णधार म्हणून पाच विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला. त्याच्या सीपीएल कारकिर्दीतील ही दुसरी आणि टी-२० कारकिर्दीतील सहावी ५ विकेट्स हॉल कामगिरी आहे.

एका सामन्यात ५ विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू

वयाच्या ४७ व्या वर्षी ताहीरने टी-२० क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेऊन एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तो आता टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील पाच विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या ४७ वर्षे आणि १६६ दिवसांत ही कामगिरी केली. याबाबतीत, त्याने कुक आयलंड्सचा गोलंदाज तोमाकंते रिटावाचा विक्रम मोडला आहे, ज्याने वयाच्या ४६ वर्षे आणि २९९ दिवसांत टी-२० मध्ये पाच विकेट्स घेतले होते.

🚨 HISTORY BY 47-YEAR-OLD IMRAN TAHIR 🔥 – He becomes the oldest player ever to take a five-wicket haul in T20 Cricket. Captain of Guyana Amazon Warriors on Prime touch. pic.twitter.com/xF5OaGvQ0M — Johns. (@CricCrazyJohns) September 10, 2026

टी२० क्रिकेटमध्ये ५ विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू

  • इमरान ताहीर -४७ वर्षे १६६ दिवस (२०२६)
  • तोमकानुते रिटावा – ४६ वर्षे २९९ दिवस (२०२२)
  • इमरान ताहीर – ४६ वर्षे १४८ दिवस (२०२५)
  • इमरान ताहीर – ४४ वर्षे ३२३ दिवस (२०२४)
  • प्रकाश मिश्रा – ४४ वर्षे १६५ दिवस (२०२३)
  • इमरान ताहीर – ४२ वर्षे १३५ दिवस (२०२१

गियानाने जिंकला सामना

या सामन्यात सेंट लुसिया किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, सेंट लुसिया किंग्सला पूर्ण २० षटके खेळता आली नाहीत आणि १८.५ षटकांत ११९ धावांवर त्यांचा डाव कोसळला. गयानासाठी कर्णधार इमरान ताहीरने सर्वाधिक पाच विकेट्स घेतले.याव्यतिरिक्त, मेहिदी हसन मिराझने तीन विकेट्स घेतले, तर ड्वेन प्रिटोरियस आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतला. प्रत्युत्तरात, गयानाने १८.३ षटकांत सहा विकेट्स गमावून १२२ धावा करत सामना सहज जिंकला. गयानाकडून ग्लेन फिलिप्सने ३७ धावा केल्या आणि क्वेंटिन सॅम्पसनने नाबाद ३७ धावा केल्या.

IND A vs AUS A: हार्दिक पांड्याची टीम इंडियात एन्ट्री? ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू कर्णधार

Web Title: Imran tahir 47 five wicket haul t20 world record cpl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • cricket
  • South Africa
  • Sports News

संबंधित बातम्या

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?
1

श्वास रोखायला लावणारा थरार! मायटी स्टार्सचा १ रन्सचा विजय तर…; DSP Cricket League मध्ये काय घडले?

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स
2

Sportsfield Monsoon League: सलग दोन विजय! १४ वर्षांखालील लीगमध्ये ‘क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी’चा दमदार परफॉर्मन्स

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय
3

Badminton: खतरनाक, लयं भारी! बॅडमिंटन स्पर्धेत ‘या’ संघांनी पटकावला सलग दुसरा विजय

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी
4

Q Sports League 2026: आरसीबीसी लेजंड्सचे वर्चस्व, सलग दोन विजयांसह मारली बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.