Steve Smith Overtakes Steve Waugh
Steve Smith Overtakes Steve Waugh 3rd Highest Run-Scorer: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे खेळला जात आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी उत्कृष्ट कामगिरी करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. स्मिथने स्टीव्ह वॉचा विक्रम मोडला आहे. आता तो रिकी पाँटिंग आणि ॲलन बॉर्डर यांचा रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ आहे.या यादीत फक्त पाँटिंग आणि ॲलन बॉर्डर हेच स्मिथच्या पुढे आहेत.(Steve Smith Overtakes Steve Waugh)
स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी खेळी केली नाही. पण त्याने या सामन्यात एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याने ५३ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. या खेळीमुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा रिकी पाँटिंगने केल्या आहेत, त्याच्या नावावर १३,३७८ धावा आहेत. ॲलन बॉर्डर ११,१७४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथ १०,९४५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह वॉ आता १०,९२७ धावांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नर ८,७८६ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने १२५ कसोटी सामन्यांमधील २२३ डावांमध्ये ३७ शतके झळकावली आहेत. तसेच ४५ अर्धशतकेही ठोकली आहेत. स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७० सामन्यांत ५८०० धावा केल्या आहेत, तर ६७ टी-२० सामन्यांत १०९४ धावा केल्या आहेत.
डर्बन कसोटीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड नऊ धावांवर बाद झाला, तर निक मॅडिसन ३३ चेंडूंचा सामना करून तंबूत परतला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या, पण पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर लॅबुशेन ३७ धावा करून बाद झाला. तर, स्टिव्ह स्मिथ देथील २५ धावा करुन बाद झाला.






