
यशस्वी जायस्वाल पुन्हा शून्यावर बाद (फोटो सौजन्य - Instagram)
यशस्वी जायस्वालने या वर्षी ऑगस्टपासून कसोटी क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, चंदीगडविरुद्ध मुंबईकडून देशांतर्गत रणजी ट्रॉफी सामन्यात सलामी देताना तो १३ चेंडूंमध्ये शून्यावर बाद झाला होता. गॉल येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही जयस्वाल शून्यावर बाद झाला होता. अनिर्णित राहिलेल्या त्या मालिकेत जयस्वालने तीन डावांत एकूण ७७ धावा केल्या होत्या. त्या कसोटीपूर्वी, तो एसएलसी इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यातही शून्यावर बाद झाला होता.
Yashasvi Jaiswal’s poor start to NZ tour continues.
His scores across 3 innings vs NZ-A: 17, 5, 0.
With KL also not scoring runs in the first unofficial test (0,4) India’s opening looks weak before the 1st Test starting Nov 19. https://t.co/kIfhQfA1SW — Saurav Trivedi (@Auravauraa) October 31, 2026
कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, यशस्वी एकदिवसीय संघात आपले स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु त्याला संधी मिळत नाहीये. यशस्वीचा नुकताच वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला होता, परंतु तिन्ही सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसवण्यात आले. त्यानंतर, ४ नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठीच्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
यशस्वीने इंडिया ‘अ’ संघासाठी दाखवलेला फॉर्म व्यवस्थापनासाठी साहजिकच चिंतेचा विषय आहे. तथापि, यशस्वीमध्ये जोरदार पुनरागमन करण्याची क्षमता आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळणार आहे. ही कसोटी मालिका १९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा भारतीय सलामीवीर मैदानावर काय कमाल करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
NZ A Vs IND A: ‘न्यूझीलंड ए’ ने ‘इंडिया ए’चे उडवले तीन तेरा; KL Rahul अन् ‘हा’खेळाडू फ्लॉप, 95 वर…
Ans: सध्या हे सामने न्यूझीलंडमध्ये खेळले जात आहेत
Ans: आतापर्यंत ९ डावात ४ वेळा यशस्वी शून्यावर बाद झाला आहे
Ans: आजही भारताचा डाव चालू असून २०० चा आकडा पार केला आहे