इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए (फोटो- सोशल मिडिया)
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या ‘इंडिया ए’ संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. लिंकन येथील बर्ट सुटक्वाइल ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. सामन्यात न्यूझीलंड ए संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी पूर्णपणे खरा ठरवल्याचे दिसून येत आहे.
IND Vs NZ: आज नुसता राडा! Shreyas Iyer मोडणार रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड? न्यूझीलंडविरुद्ध भिडणार
मात्र गोलंदाजी करताना न्यूझीलंडने इतका अचूक आणि भेदक मारा केला की भारताचे फलंदाज ढेपाळले. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधीच भारतीय संघाने आपल्या ४ महत्त्वाचे फलंदाज केवळ ५२ रन्स करून गमावले होते. भारताच्या फलंदाजांना मोठी भागीदारी न्यूझीलंडने रचू दिली नाही. त्यामुळे सध्या इंडिया ए ने ९५ रन्स वर ९ विकेट्स गमावल्या आहेत.
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या ‘इंडिया ए ची पहिल्याच कसोटीत स्थिती खराब झाली आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला स्टार फलंदाज केएल राहुलचा खराब फॉर्म आज पुन्हा दिसून आला. एकही रन न करता तो आउट झाला. यशस्वी जयस्वालने १७ रन्स केल्या. तो देखील मोठी खेळी करू शकला नाही. डावाच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या साई सुदर्शनने १३ बॉल खेळले. मात्र तो देखील शून्यावर आउट झाला.
IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी
कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल देखील काही चांगली खेळी करू शकला नाही. तो केवळ १ रन करू शकला. तर श्रीलंकेविरुद्ध आक्रमक शतकी खेळी करणारा देवदत्त पडीकलने एकाकी खिंड लढवली. त्याने ३२ रन्सची महत्वाची खेळी केली. तर यश राठोड सध्या ४४ रन्सवर नॉट आउट खेळत आहे.
Ans: न्यूझीलंड ए विरुद्ध इंडिया ए ने पहिल्याच दिवशी 95 रन्सवर 9 विकेट्स गमावल्या आहेत.
Ans: केएल राहुल आणि साई सुदर्शन शून्यावर आउट झाले आहेत.






