
photo- social media
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. हा सामना ऑकलंड येथील ईडन पार्क स्टेडियवर सुरु आहे. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ विकेट्स गमावून २५९ धावा केल्या. संघाचा स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सने ४६ चेंडूमध्ये धमाकेदार फलंदाजी करत शतक झळकावले. तर, मायकल ब्रेसवलने देखील तुफानी खेळी करत २५ चेंडूमध्ये ६५ धावा ठोकल्या. भारताला विजयासाठी २० षटकांत २६० धावांची गरज आहे. (Glenn Phillips)
भारताने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. ईशान किशनचे संघात पुनरागमन झाले आहे. तर, वैभव सूर्यवंशी आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे. वैभवच्या जागी ईशानला, तर भुवनेश्वरच्या जागी मयंक यादवला संघात स्थान मिळाले आहे.
टीम सेफर्ट आणि फिन अॅलेनने न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. मयंक यादवने आपल्या पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर सेफर्टला बाद भारताला पहिले यश मिळवून दिले. सेफर्टने ५ चेंडूंमध्ये ३ धावा करुन स्वस्तात बाद झाला . त्यानंतर, मयंक यादवने आपल्या वेगाने न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. त्याने एक अचूक यॉर्कर टाकून डॅरिल मिचेलला पायचीत (LBW) केले. मिचेलने रिव्ह्यू घेतला, पण चेंडू थेट त्याच्या बॅकफूटला लागल्याने पंचांचा निर्णय कायम राहिला. मिचेलने अवघ्या ९ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या.
यानंतरअक्षर पटेलने भारताला तिसरा विकेट मिळवून दिला. अक्षरने फिन ॲलनची धडाकेबाज खेळी संपुष्टात आणली. फिन १७ चेंडूंमध्ये ३१ धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. यानंतर, मयंक यादवने न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. मयंकने जेकब्सला ७ धावांवर बाद करुन पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
यानंतर, ग्लेन फिलिप्स आणि मायकेल ब्रेसवल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. ब्रेसवेलने २५ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. परंतु,प्रिन्स यादवने एका अचूक यॉर्करवर मायकल ब्रेसवेलची धडाकेबाज खेळी संपुष्टात आणली. एकीकडे विकेट पडण्याचे सत्र सुरु असताना, दुसऱ्या टोकावर मात्र, फिलिप्सने आपली वादळी खेळी सुरुत ठेवली. त्याने तुफान फटकेबाजी करत ४६ चेंडूमध्ये शानदार शतक ठोकले. अखेर नितीश रेड्डीच्या चेंडूवर फिलिप्स ४९ चेंडूमध्ये १०७ धावा करुन बाद झाला. फिलिप्स आणि ब्रेसवेलच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ६ विकेट्स गमावून २५९ धावा केल्या. भारताकडून मयंक यादव भेदक गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतले. तर, अक्षर पटेल, अर्शदिप सिंग, प्रिन्स यादव आणि नितीश कुमार रेड्डीने प्रत्येकी एक विकेट घेतला.
भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव.
न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर.