Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट

IND vs AFG Team India Squad: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियातील अनेक अनुभवी खेळाडूंना डच्चू मिळाला आहे तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कोण आहेत हे नवीन खेळाडू, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 20, 2026 | 06:57 PM
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट
Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची घोषणा
  • दिग्गज खेळाडूंना मिळाला डच्चू
  • या ४ नवीन खेळाडूंना दिली संधी
भारतीय नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (दि.१९) अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. याआधी संघांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कसोटी आणि वनडे संघातून ९ अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आले आहे. तर, संघात एकूण चार नवीन चेहऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे आणि प्रिन्स यादव यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांची कसोटी आणि एकदिवसीय संघासाठी निवड करण्यात आली आहे. प्रिन्स यादवचा फक्त एकदिवसीय संघात समावेश आहे. तर, मानव सुथारची फक्त कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

या दिग्गज खेळाडूंना मिळाला डच्चू

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी आकाश दीपला दुखापतीमुळे संघात स्थान मिळू शकले नाही, तर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर, एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी हर्षित राणा, ऋषभ पंत, आयुष बडोनी यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज सारख्या दिग्गजांना संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतग्रस्त असल्याने हर्षित राणाला संघात स्थान मिळाले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत यांना त्यांच्या कामगिरीमुळे संघातून वगळण्यात आले आहे. टीम मॅनेजमेंटला रवींद्र जडेच्याच्या ऐवजी नवीन पर्याय आजमावून पाहायचे आहे म्हणून त्यालाही विश्रांती देण्यात आली आहे. भारताने शेवटची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळली होती.

या ४ नवीन खेळाडूंना दिली संधी

गुरनूर ब्रार

पंजाबचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघात पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. गुरनूरने डिसेंबर २०२२ मध्ये गोव्याविरुद्ध लिस्ट ए मध्ये पदार्पण केले होते. त्याने २०२३ मध्ये त्याने पंजाब किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. नंतर गुजरात टायटन्सने त्याला १.३० कोटी रुपयांना संघात घेतले.

  • प्रथम-श्रेणी: १८ सामने, ५२ विकेट्स
  • सर्वोत्तम कामगिरी ५/१४
  • लिस्ट-ए: ९ सामने, १२ विकेट्स
  • देशांतर्गत टी२०: ९ सामने, १० विकेट्स
हर्ष दुबे

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिकांसाठी महाराष्ट्राचा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेची निवड संघात करण्यात आली आहे. ज्युनियर क्रिकेटमधील प्रभावी कामगिरीनंतर, त्याला विदर्भ वरिष्ठ संघात स्थान मिळाले. देशांतर्गत क्रिकेटमध्येही दुबे विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करतो. २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये ६९ विकेट्स घेत आपल्या दमदार कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

  • प्रथम-श्रेणी: २७ सामने १३३ विकेट्स
  • सर्वोत्तम कामगिरी ६/३६
  • लिस्ट-ए: ३० सामने ३१ विकेट्स
  • देशांतर्गत टी२०: ३८ सामने ३४ विकेट्स
  • आयपीएल: ११ सामने, १३ विकेट्स
प्रिन्स यादव

जव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. प्रिन्सने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पदार्पण हंगामात ७. ५४ च्या इकॉनोमी रेटने ११ विकेट्स घेतले. तो या स्पर्धेत दिल्लीचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.

  • प्रथम-श्रेणी: २ सामने १ विकेट्स
  • लिस्ट-ए: १४ सामने २९ विकेट्स
  • देशांतर्गत टी२०: ३३ सामने, ३८ विकेट्स
  • आयपीएल: १८ सामने, १९ विकेट्स
मानव सुथार

अफगाणिस्तान कसोटी मालिकेसाठी मानव सुथारला संघात स्थान देण्यात आले आहे. मानव सुथार देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानकडून आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. सुथारने २०२२-२३ च्या रणजी ट्रॉफी हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने संपूर्ण हंगामात ३९ विकेट्स घेतले. देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर, त्याला आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. आयपीएल २०२४ साठी गुजरात टायटन्सने त्याला २० लाख रुपयांना विकत घेतले.

  • प्रथम-श्रेणी: २९ सामने, १२९ विकेट्स
  • सर्वोत्तम कामगिरी ८/३३
  • लिस्ट-ए: २५ सामने, ३४ विकेट्स
  • देशांतर्गत टी२०: २९ सामने, २५ विकेट्स
  • आयपीएल: ५ सामने, २ विकेट्स
KKR vs MI: प्लेऑफच्या रेसमध्ये KKR बाजी मारणार की MI देणार धक्का; कशी असेल ईडन गार्डन्सची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११?

Web Title: Ind vs afg 2026 india squad new players harsh dube gurnoor brar manav suthar prince yadav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • bcci
  • indian cricket team
  • Team India Squad

संबंधित बातम्या

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा
1

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र
2

क्रिकेट मॅचदरम्यान कंडोम आणि डेटिंग Apps च्या जाहिरातींवर बंदी घाला! CTI चे ICC अध्यक्ष जय शाह यांना खळबळजनक पत्र

जाणार, जाणार! Shreyas Iyer कॅप्टन्सी धोक्यात? रँकिंग घसरले; आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम
3

जाणार, जाणार! Shreyas Iyer कॅप्टन्सी धोक्यात? रँकिंग घसरले; आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम

आज भयानक स्कोअर होणार? Vaibhav Sooryavanshi इंग्लंडविरुद्ध डेब्यू करणार; ‘ती’ पोस्ट व्हायरल
4

आज भयानक स्कोअर होणार? Vaibhav Sooryavanshi इंग्लंडविरुद्ध डेब्यू करणार; ‘ती’ पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.